'भाषा शिकवा पण भाषेसाठी हिंसा करू नका'

नागपूर : महाराष्ट्रात भाषेच्या आधारावर वाढत्या हिंसाचारावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी टीका केली आहे. नागपूर येथील विधीमंडळ परिसरात अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ अबू आझमी आणि रईस शेख यांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.


‘मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशभरातून लोक येथे रोजगारासाठी येतात. जे येथे जन्मलेले नाहीत किंवा ज्यांचे शिक्षण येथे झाले नाही, त्यांना मराठी शिकवायची असेल तर ती प्रेमाने शिकवा. पण भाषेच्या नावावर मारहाण करणे आणि दुकान तोडणे हे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असे अबू आझमी म्हणाले. त्यांनी नाव न घेता मराठीवरुन राजकारण ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. मराठी भाषा अनिवार्य करायची असेल तर ती शाळांमध्ये सक्तीची करावी, पाठ्यपुस्तके वाटावीत. पण भाषेच्या नावावर व्यक्तिगत हल्ले आणि अपमान होत असेल तर त्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.


‘देशभरात व्यवसाय असलेल्या अनेक कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. तिथल्या कर्मचाऱ्यांना मराठी बोलायला कोणी सांगत नाही. पण रिक्षाचालक, भाजीविक्रेते किंवा रस्त्यावर कष्ट करणाऱ्या गरीब मजुरांनाच लक्ष्य केले जाते. त्यांच्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल केले जातात.' या प्रकरणात कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अबू आझमींनी केली.

Comments
Add Comment

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

शिंदे माझे मित्र, आम्ही एकत्रित आहोत आणि एकत्रित लढू - देवेंद्र फडणवीस

नागपूर : महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६