मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी


नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर येथील 'शुक्ला कंपाउंड' तोडकामावरून विधानसभेत मुंबई उपनगरातील पागडी सिस्टीम (भाडेकरू) धारकांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. आमदार चौधरी यांनी प्रश्न केला की, जर हे गाळे १९७० पासूनचे होते, तर मुंबई महापालिका त्यांच्याकडून टॅक्स आणि गुमास्ता सर्टिफिकेट कसे घेत होती?


त्यांनी आरोप केला की, कारवाई करताना बाउन्सर उभे करण्यात आले आणि 'तोडकामाला कोणी सुपारी घेतली' याची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) नेमण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.


"मुंबई शहरात पागडी सिस्टीमला कायद्याचे संरक्षण आहे. उपनगरात मात्र वेगळा कायदा आहे," असे सांगत, शहराला लागू असलेला १९६२ आणि १९६४ पूर्वीच्या पागडी सिस्टीमच्या संरक्षणाचा कायदा मुंबई उपनगरालाही लागू करणार का? असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा