महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीवर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यात आले आहे. आमदार शरद सोनावणे यांनी विधानसभा परिसरातच ‘बिबट्याच्या वेशात’ दाखल होऊन या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले. ही घटना अधिवेशनातील प्रमुख आकर्षण ठरली आणि राजकीय व सामाजिक चर्चेचा विषय बनली. आमदार शरद सोनवणे यांनी या प्रश्नाची तीव्रता सभागृहासमोर मांडून सरकारला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.



बिबट्यांच्या हल्ल्यांची भयावह आकडेवारी आणि भीतीचे वातावरण:


आमदार सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या तब्बल नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या संख्येमुळे मनुष्य-प्राणी संघर्ष वाढला आहे. एकट्या जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये ५५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले अंगणात खेळायलाही धजावत नाहीत. शेतकरी शेतीत काम करण्यासाठी कचरत आहेत, ज्यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे.



'राज्य आपत्ती' घोषित करण्याची आणि तातडीने रेस्क्यू सेंटर्स उभारण्याची मागणी


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सोनवणे यांनी सरकारकडे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यांना 'राज्य आपत्ती' घोषित करून, मुख्यमंत्र्यांनी यावर 'सु-मोटो' निर्णय घ्यावा. सध्याचे उपाय निरुपयोगी ठरत असल्याने, बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी तातडीने केंद्रे उभारण्याची गरज आहे. जुन्नर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथे प्रत्येकी एक हजार बिबटे ठेवता येतील, अशा क्षमतेची दोन रेस्क्यू सेंटर्स तीन महिन्यांच्या आत उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.



विधानपरिषदेतही गंभीर चर्चा


याचदरम्यान, नागपुरात जिथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तिथेही बिबट्या आढळल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विधानपरिषदेत या विषयावर माहिती दिली, आज नागपूरात बिबट्या आढळला आहे, त्याबद्दल माहिती घेतली आहे. कालदेखील खालच्या सभागृहात सविस्तर चर्चा झाली आहे. आज विदर्भातील आमदारांची बैठक लावण्यात आली आहे.... यामध्ये आणखी सविस्तर चर्चा केली जाईल."

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास