गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’


हॉटेल्स्, रेस्टॉरंट, पब, बारची होणार तपासणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी): गोव्यात आगीची दुघर्टना घडताच मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दल सतर्क झाले असून नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स्, आस्थापना, गृहसंकुल व इमारती, समुद्र किनाऱयावर व अन्य ठिकाणी कार्यक्रम, स्वागत सोहळ्यांच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येणार आहे. नियमित होणाऱ्या अग्निसुरक्षा तपासणी व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाकडून ही विशेष मोहिम असेल.येत्या २२ डिसेंबर २०२५ ते दिनांक २८ डिसेंबर २०२५ या ७ दिवसांत करण्यात येणार आहे.


दोन दिवसांपूर्वी गोव्यातील एका नाईट क्लबला आग लागून अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, साहित्य आणि उपकरणांसह मुंबई अग्निशमन दल सज्ज आहे. आगीच्या घटना घडू नये यासाठी व्यापक जनप्रबोधन केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात, यासाठी मुंबई अग्निशमन दल सतत प्रयत्नशील असल्याचेही, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.


अग्निशमन दलाच्या या विशेष मोहिमेत संबंधित आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्ती यांचे पालन न केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येणार आहे.





या वर्षीही मुंबई अग्निशमन दलाकडून मुंबईतील विविध रेस्टॉरंटस्, हॉटेल्स्, बार, पब, लॉजिंग-बोर्डिंग, पार्टी हॉल्स्, जिमखाने, बँक्वेट हॉल्स्, अतिगर्दी होणारे मॉल्स्, तारांकित हॉटेल्स् यासारख्या आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्तींचे पालन केले नसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे, असे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले.


मागील वर्षीही विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. मागील वर्षी केलेल्या मोहिमेत मुंबईतील विविध इमारती, हॉटेल, मॉल्स आदींसारख्या संभाव्य गर्दीच्या ७३१ आस्थापना तसेच ठिकाणांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील अग्निसुरक्षेविषयक अटी व उपाययोजनांचे अनुपालन न केल्याने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार १२ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली होती. परिणामी अशा ठिकाणी आगीच्या दुर्घटना टाळता आल्या होत्या.



चौपाट्यांवर सज्ज असणार बोटी व जीवसंरक्षक


नववर्षाच्या पूर्वसंध्येस सुरक्षेविषयक उपाययोजना म्हणून विविध समुद्रकिनाऱ्यावरील चौपाट्यांवर देखील जीवरक्षक, बोटी व जीवसंरक्षक साधने यासह मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी किंवा आग लागल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवून जीवितहानी व वित्तहानी रोखण्यासाठी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ चे कलम ३ (१) नुसार आपल्या इमारतीमध्ये किंवा आस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांतील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे दायित्व संबधित मालक तथा भोगवटादार यांचे आहे.

Comments
Add Comment

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन

प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्‍यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्‍य निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम आज मंगळवार, ९ डिसेंबर

कूपर रुग्णालयात अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली, सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. रूस्‍तम नरसी कूपर रुग्णालयातील रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तातडीने आणि