बिग बॉस हरुनही मराठमोळा प्रणित मोरे जिंकलाच,सलमान खानसोबत या सिनेमात झळकणार?

Bigg Boss 19 Pranit More मुंबई : बिग बॉस सीझन १९ चा ग्रँड फिनाले नुकसातच झाला. यंदाचा सीझन छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव खन्नाने जिंकलाय.बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्येच सलमान खानने त्याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'किक-२' सिनेमाचीही घोषणा केली.यावेळेस सिनेमासाठी प्रणित मोरेच्या नावाची शिफारस करणार असल्याचंही सलमानने म्हटलं. पण खरंच सलमान असं करणार आहे की त्याने मस्करी केली? नेमकं काय घडलंय...


सलमान खानकडून 'किक 2' सिनेमाची घोषणा


बिग बॉस सीझन १९ ग्रँड फिनालेमधून प्रणित मोरे आऊट झाला,त्यावेळेस त्याला बॅगेजसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.त्यावर प्रणित म्हणाला की,माझं एक बॅगेज होते की मी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर जोक केले होते.तर ते बॅगेज देखील मी इथेच सोडून जातोय.त्यावर सलमानने लगेच म्हटलं की,"थांब,ते बॅगेज आम्ही रिकामं करू,ती आमची जबाबदारी आहे.आता मी 'किक २'सिनेमा करतोय आणि तुझ्या नावाची शंभर टक्के शिफारस करणार आहे". सलमान असं म्हणताच प्रणित मोरेसह उपस्थितांपैकी कोणालाच हसू आवरलं नाही.

Comments
Add Comment

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय

अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक

अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता

तारा सुतारीया आणि वीर पहारिया यांच्या ब्रेकपची रंगली चर्चा, सोशल मीडियावर एकमेकांना केले...

मुंबई : अभिनेत्री तारा सुतारीया आणि वीर पहारिया हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हे कपल एकमेकांना वर्षभरापासून डेट

O Romio Teaser : खतरनाक टॅटू, हातात बंदूक अन् क्रूर हास्य...शाहिद कपूरचा ‘ओ रोमिओ’मधील रक्तरंजित अवतार पाहिलात का?

मुंबई : बॉलिवूडमध्ये २०२६ सालाची सुरुवात अत्यंत दिमाखदार झाली असून, सध्या एकाच चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली

गेल्या चार वर्षांपासून ओटीटीवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे 'ही' वेब सीरीज.

Wednesday : चित्रपटांसोबत आता ओटीटी हे मनोरंजनाचं माध्यम बनलं आहे. सध्या ओटीटी वर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज,

चि व चि. सौ. का”ची हिट जोडी मराठी - जपानी रोमँटिक चित्रपटात

मुंबई : मानाच्या २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF), “तो, ती आणि फुजी”ची अधिकृत निवड झाली असून, या