वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य हारून खान यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.


राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, मॉलमध्ये मधल्या भिंती काढून फेरबदल करण्यात आले होते. यासाठीचा बदल आराखडा महापालिकेने २४ फेब्रुवारी २०२० रोजी मंजूर केला होता. तसेच बहुउद्देशीय हॉलसाठी पर्पज बदलाची परवानगी २०२३ मध्ये देण्यात आली होती. या काळात दोन कोटींच्या दंडाची वसुली आणि तीन कोटींचा प्रीमियम महापालिकेने घेतला. मे महिन्यात आलेल्या तक्रारीनंतर तपासात मॉलमध्ये शेडसह नवीन अतिक्रमण असल्याचे महापालिकेने मान्य केले असून त्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. तसेच इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या स्ट्रक्चरल सुरक्षिततेबाबतही महापालिकेला तातडीने ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


या मॉलमध्ये वारंवार विनापरवाना बांधकाम होत असल्यास एमआरटीपी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

Comments
Add Comment

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण

मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी​ नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी

दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल–२  आणि सी.एल–३  परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी

बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त

'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक