शासकीय कार्यालयांत यूडीआयडी कार्ड सक्ती; बोगस प्रमाणपत्रधारकांवर कडक कारवाई सुरू - मंत्री अतुल सावे

नागपूर : राज्यातील सर्व शासकीय कार्यालये व विभागांमध्ये युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड सादर करणे ९  ऑक्टोबर २०२५  पासून सक्तीचे करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय सर्व विभागांना कळविण्यात आला आहे. आरक्षण, पदोन्नती, विविध शासकीय सवलती यांसाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य असून, जानेवारी २०२६  अखेरपर्यंत सर्व शासकीय कार्यालयांना कागदपत्रांची पडताळणी सादर करणे आवश्यक असल्याचे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.


विधानसभा सदस्य बापू पठारे, बबनराव लोणीकर, सुनील प्रभू, विजय वडेट्टीवार, विक्रम पाचपुते, हेमंत उगले या सदस्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात प्रश्न उपस्थित केला, त्यावेळी ते बोलत होते.


राज्यात काही ठिकाणी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचे प्रकार आढळल्याने त्यावर मोठी कारवाई सुरू आहे. सातारा जिल्ह्यात ५९८  पैकी ७८  जण, पुण्यात ४२८  मधील ४६  जण, लातूरमध्ये २६  जण तर यवतमाळमध्ये २१  कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. नंदुरबारमध्येही  कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. सर्व प्रकरणे संबंधित महसूल, सार्वजनिक बांधकाम तसेच इतर नियुक्ती करणाऱ्या विभागांकडे पाठविण्यात आली असून, तिन्ही महिन्यांत कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तींवर दिव्यांग अधिनियम २०१६  च्या कलम ९१  नुसार दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. शासकीय रुग्णालयांनी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीसाठी आठवड्यात किमान दोन दिवस उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचनाही शासनाने दिल्या असल्याचे मंत्री श्री.सावे यांनी सांगितले


दरम्यान, अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘वैश्विक दिव्यांग प्रणाली’चा पासवर्ड चोरीला गेल्याची माहिती समोर आली असून, याबाबत गंभीर चौकशी व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.


यूडीआयडी प्रणालीवरील नियम हे केंद्र शासनाने ठरविलेले असल्याने राज्य सरकाराला त्यात स्वतंत्र बदल करण्याचे अधिकार नाहीत; तथापि, आवश्यक सूचना केंद्राकडे पाठविण्यात येतील, असेही मंत्री श्री.सावे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा