कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१ धावांनी जिंकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव झाला. कटकच्या सामन्यात भारताचा हार्दिक पांड्या चमकला. त्याने नाबाद ५९ धावा केल्या तसेच दक्षिण आफ्रिकेच्या एका फलंदाजालाही बाद केले. कटकमध्ये झालेल्या विजयामुळे भारताने पाच सामन्याच्या टी २० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे.



कटकच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना भोवला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सहा बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त ७४ धावांत आटोपला. भारताने १२.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला. भारताकडून अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह या चौघांनी प्रत्येकी दोन तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने शून्य, एडेन मर्करामने १४, ट्रिस्टन स्टब्सने १४, डेवॉल्ड ब्रेव्हिसने २२, डेव्हिड मिलरने एक, डोनोव्हन फरेराने पाच, मार्को जॅनसेनने १२, केशव महाराजने शून्य, अँरिक नॉर्टजेने एक, लुथो सिपामलाने दोन, लुंगी न्गिडीने नाबाद दोन धावांचे योगदान दिले.


याआधी भारताकडून अभिषेक शर्माने १७, शुभमन गिलने चार, सूर्यकुमार यादवने १२, तिलक वर्माने २६, अक्षर पटेलने २३, हार्दिक पांड्याने नाबाद ५९, शिवम दुबेने ११, जितेश वर्माने नाबाद दहा धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी न्गिडीने तीन, लुथो सिपामलाने दोन आणि डोनोव्हन फरेराने एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

आरसीबीला मोठा धक्का; वेगवान गोलंदाज यश दयाल आयपीएल २०२६ मधून बाहेर

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज यश दयाल वैयक्तिक

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल आयपीएलच्या 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमावर नाराज

- दिल्ली कॅपिटल्सला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कच्या ना हरकत प्रमाणपत्राची प्रतीक्षा आयपीएल २०२६

Pakistan Super League : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेवर दहशतीचे सावट? परदेशी खेळाडूंना तात्काळ माघार घेण्याचा इशारा

गुरुवार २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) ११ व्या हंगामावर दहशतीचे सावट पसरलेले दिसत

हॉकी इंडियाची ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकने जाहीर

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकनांची यादी जाहीर केली. २७ मार्च २०२६ रोजी नवी

IPL 2026 : मुंबई इंडियन्समध्ये ‘कॅप्टन्सची लढत’; हार्दिक पंड्याने स्वतःहून कर्णधारपद सोडावे; श्रीकांत यांचा सल्ला

मुंबई इंडियन्स संघाची नजर आयपीएल २०२६ च्या हंगामात सहाव्या विजेतेपदावर आहे. मात्र यंदाचा सीझन खास ठरणार आहे,

IPL 2026 : केकेआरच्या संघात सौरभ दुबेला संधी

तीन वेळचे चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने विदर्भातील उंच डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबेला करारबद्ध केले आहे.