Dhurandhar Viral Song : "अक्षय शूटिंगदरम्यान छोटा सिलेंडर घेऊनच फिरत होता";कोरिओग्राफरने सांगितला किस्सा

 

मुंबई : अक्षयचे एन्ट्री सॉन्ग असलेले 'FA9LA,बहरीनच्या हिप-हॉप स्टार फ्लिपराची याने बनवले आहे,तर या गाण्याची कोरिओग्राफी विजय गांगुलीने केली आहे. 'धुरंधर'या चित्रपटात रहमान डकैतच्या भूमिकेतील अक्षय खन्नाच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून,विशेषतः 'FA9LA'या गाण्यातील त्याचे डान्स मूव्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.चित्रपटामध्ये अक्षय खन्नासोबत रणवीर सिंह,अर्जुन रामपाल,सारा अर्जुन आणि आर.माधवन यांसारखे कलाकार आहेत.या गाण्याच्या शुटिंगदरम्यान अक्षयला सिलेंडर घेऊन फिरावं लागलं.


ऑक्सिजन लेव्हल कमी झाला


विजय गांगुलीने सांगितलं की,अक्षय खन्नाला सीनमध्ये नेमके काय करायचे आहे, हे अचूकपणे माहीत असते आणि तो सीनसोबत खेळतो.लडाखमध्ये शूटिंगदरम्यान त्याला आलेले एक मोठे आव्हान देखील कोरिओग्राफरने शेअर केले.


एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत विजय गांगुलीने या गाण्याच्या शूटिंगचे काही किस्से शेअर केले,लडाखमधील अतिउंच ठिकाणी शूटिंग करताना अक्षय खन्ना त्याच्यासोबत एक लहान ऑक्सिजन सिलेंडर ठेवत असे.आम्ही हे गाणे शूट करत असताना त्याचा ऑक्सिजन लेव्हल कमी झाला होता.प्रत्येक शॉट झाल्यानंतर अक्षय ऑक्सिजन मास्क लावत असे. त्याने अडचणींवर मात करत हा संपूर्ण डान्स सिक्वेन्स पूर्ण केला.


अक्षयचा सहज अभिनय


हे गाणे अक्षयला 'शेर-ए-बलूच'चा मुकुट घातल्याचा उत्सव आहे.त्याला डान्सर्समधून नाचत यायचे होते आणि सिंहासनावर बसायचे होते.सीनचा मूड आणि डान्सर्सचा परफॉर्मन्स पाहून अक्षयने म्हटले की,जेव्हा तो आत येईल,तेव्हा थोडा डान्स करेल.विजय गांगुलीने सांगितले की,तो काय करणार आहे,हे आमच्यापैकी कोणालाही माहित नव्हते.अक्षय सीनमध्ये आला,त्याने आपोआप परफॉर्म केले.त्या दिवशी आम्ही घेतलेला पहिला शॉट परफेक्ट होता.नंतर आम्ही एक क्लोज-अप घेतला आणि आमचे काम पूर्ण झाले.

Comments
Add Comment

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या