मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याने धूरंधर या चित्रपटात फ्लिपराचीचं गाणं 'Fa9la' मध्ये आपल्या व्हायरल डान्स एन्ट्रीने सर्व प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या गाण्याबाबतचा किस्सा अक्षयचा सिनेमातील भाऊ दानिश पंडोरने सांगितला. डान्स स्क्रिप्टेड नव्हता. अक्षय खन्नाला वाटलं कि इथे मी एक डान्स करू शकतो आणि त्याने सुरू केलं; असं दानिश म्हणाला.
गाणं लेह लडाखमध्ये शूट केलं आहे. हे संपूर्ण गाणं विजय गांगुली कोरिओग्राफ करत होते. अक्षय खन्नाने गाण्यावरील एन्ट्री सीन इम्प्रोवाइज़ करून घेतली आहे . ते गाणं आम्ही आधी ऐकलं होतं, तेव्हाच सर्वांना खूप आवडलं सुद्धा होतं. आदित्य सर अक्षय सरांना शॉट समजावून सांगत होते. संपूर्ण कॉरिओग्राफी सुरूच होती आणि त्याचदरम्यान अक्षय सरांनी आदित्यला विचारलं, की मी डान्स करू शकतो का? आदित्य सर म्हणाले, जे तुला आवडेल ते कर... अशी माहिती दानिशने दिली.
अन् तयार झाली व्हायरल हुक स्टेप
दानिशने सांगितले की , एक टेक होताच, आम्ही सर्वजण एन्ट्री घेतो . अक्षय सर सर्वांना डान्स करताना पाहून स्वत:ही डान्स करायला सुरवात करतात . त्यांना कोणीही कोरिओग्राफ केलं नाही. ते पाहून सर्वजण हैराण झाले होते . शॉटनंतर सर्वजण टाळ्या वाजवू लागले. फ्रेम सुद्धा खूप चांगली सेट झाली होती.. अक्षय सर जबरदस्त आहेतच ह्यात काही शंकाच नाही .
हा डान्स सिक्वेल Fa9la एन्ट्रीचा आहे. जे गाणं बहरीनचे रॅपर फ्लिपराचीने गायलंय. या गाण्यात अक्षय म्हणजेच रहमान डकैतला ISIS सोबत डील करण्यासाठी बलूची लोकांशी भेट घेत असल्याचं दाखविण्यात आलंय. ही क्लिप व्हायरल होताच मेकर्सने चित्रपटाचं संपूर्ण गाणं रिलिज केलं. दानिश या चित्रपटात अक्षयचा चुलत भाऊ उजैर बलूचची भूमिका साकारत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह भारतीय गुप्तहेर हमजाची मुख्य भूमिका करत आहे . सोबतच अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदीदेखील या चित्रपटात आहेत.