नाताळनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर तीन विशेष गाड्या

कणकवली : हिवाळा आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांना सिंधुदुर्गातील काही स्थानकांवर थांबे आहेत.

सीएसएमटी - करमळी (०११५१/०११५२) ही गाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२६ या काळात दररोज धावणार आहे. ०११५१ सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि करमाळीला त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ०११५२ करमळीहून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहे.

लोकमान्य टिळक (टी) थिरुवनंतपुरम उत्तर विशेष (०११७१/०११७२) ही साप्ताहिक गाडी १८ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान धावणार आहे. ०११७१ लोकमान्य टिळक (टी) येथून दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम उत्तर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वा पोहचेल. ०११७२ दर शनिवारी थिरुवनंतपुरम उत्तर येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल. ही ट्रेन मध्यरात्री १ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. या गाडीचे थांबे ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जं., कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंडुराबी रोड, सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शौरानूर जं., त्रिसूर, अलुवा, अलु एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चौगनासेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम, करुणागपल्ली, सस्थानकोडा कोल्लम आणि वर्कला शिवगिरी स्टेशन्सवर असतील.

लोकमान्य टिळक (टी)- मंगळुरू जंक्शन विशेष (०११८५/०११८६) ही साप्ताहिक गाडी १६ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान दर धावेल. ०११८५ ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून मंगळवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५ वा. मंगळुरू जं. येथे पोहचेल. ०११८६ मंगळुरू जंक्शन येथून बुधवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वा. लोकमान्य टिळक (टी) येथे पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकल, मुकांबीका रोड, कुंडापूर, उडुपी आणि सुरथकाल येथे थांबणार आहे.
Comments
Add Comment

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा प्रकल्प, बोरिवली–विरार पट्ट्यात रेल्वे स्थानकांचा कायापालट

मुंबई : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या पायाभूत बदलांचा आराखडा अंतिम टप्प्यात

Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला

मुंबईत उबाठाचा पहिला नगरसेवक फुटला

सरिता म्हस्के शिवसेनेच्या संपर्कात; कल्याण-डोंबिवलीत ११ पैकी ४ नगरसेवक फुटले मुंबई : कल्याण डोंबिवली

जागतिक स्तरावर सोन्याचांदीत 'गगनभेदी' वाढ! सोन्याची प्रति ग्रॅम १६००० कडे वाटचाल चांदी ३३०००० पार

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचांदीत गगनभेदी वाढ झाली आहे. युएसने ग्रीनलँडवर कब्जा

Mumbai : चेंबूरमध्ये एलपीजी गॅस टँकर थेट रेल्वे रुळावर उलटला अन्...परिसरात खळबळ

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एका एलपीजी (LPG) गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. बी. डी. पाटील मार्गावरील सर्विस

Eternal Q3 Results: Zomato कंपनीच्या गोट्यातून मोठी बातमी: सीईओ दिपेंदर गोयल यांना राजीनामा तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात ७३% वाढ

मोहित सोमण: आज इटर्नल (Zomato) कंपनीच्या गोट्यातून दोन महत्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. कंपनीने एक्सचेंज