विधानपरिषद आणि विधानसभेचे तालिका अध्यक्ष जाहीर; ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : विधानपरिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली. तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित गोरखे, कृपाल तुमाने, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे आणि सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी जाहीर केले. तर विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केली. विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी विधानसभा सदस्य सर्वश्री चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव जानकर, रामदास मसराम, समीर कुणावार, श्रीमती सरोज अहिरे यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.


यंदा नागपूरमध्ये ८ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्याचे हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्‌’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ या गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहात ‘वंदे मातरम’ गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले. विधानसभेत आणि विधानपरिषदेत माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव एकमताने मंजूर केला.


राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कृषिपंप व वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत सवलत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. यापैकी अनिवार्य खर्चासाठी २७ हजार १६७ कोटी ४९ लाख, कार्यक्रमांतर्गत ३८ हजार ५९ कोटी २६ लाख आणि केंद्र पुरस्कृत योजनांसाठी १० हजार ५९ कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. मात्र, या स्थूल रकमेचा निव्वळ भार ६४ हजार ६०५ कोटी ४७ लाख इतका असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.


- महसूल व वन विभाग : १५,७२४.०८
- उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग : ९,२०५.१०
- नगर विकास विभाग : ९,१९५.७६
- सार्वजनिक बांधकाम विभाग : ६,३४७.४१
- महिला व बाल विकास विभाग : ५,०२४.४८
- नियोजन विभाग : ४,८५३.९९
- गृह विभाग : ३,८६१.१२
- सार्वजनिक आरोग्य विभाग : ३,६०२.८०
- जलसंपदा विभाग : ३,२२३.३९
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग : २,३१५.४४
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : २,३४४.५०
- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : १,७०३.९२
- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग : १,४७४.३५
- आदिवासी विकास विभाग : १,४६१.५६
- वैद्यकीय शिक्षण व औषधि द्रव्य विभाग : १,१८१.६२
- ग्रामविकास विभाग : ७१८.८५
- कृषी व पशु विभाग : ६१६.२१
- कोशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग : ६०१.७०

Comments
Add Comment

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक

Luthra Brothers : गोवा नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणी लुथरा बंधूंना जामीन मंजूर

उत्तर गोव्यातील नाईटक्लब आगीच्या दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अंजुनाजवळील 'बर्च बाय रोमियो

Ashok Kharat Case : भोंदू बाबा अशोक खरातची केस लढवण्यास सरकारी वकिलाचा नकार

मुंबई : भोंदू बाबा खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून कार्य करणारे अजय मिसर यांनी वाढत्या कामाच्या ताणामुळे खरात

Chief Minister's Employment Creation Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाकडे नेणारी प्रभावी वाटचाल

मुंबई: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील