घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर


नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल २०२५’ हे सादर केलं. त्यामध्ये एम्प्लॉय वेलफेअर अथॉरिटी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाच्या वेळेनंतर आणि सुट्टीच्या दिवशी कामाशी संबंधित टेलिफोन कॉल आणि ईमेलपासून डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार देता येईल. हे विधेयक खासगी सदस्य बिल म्हणून मांडण्यात आलं आहे. सरकारने लागू करावं असं वाटतं अशा विषयांवर विधेयके मांडण्याची परवानगी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना आहे. काही प्रकरणे वगळता, बहुतेक खासगी सदस्य विधेयके प्रस्तावित कायद्याला सरकारने प्रतिसाद दिल्यानंतर मागे घेतली जातात. ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा अधिकार


हे बिल पास झाले, तर अशा लोकांना फायदा होईल, जे ऑफीसच्या कामाच्या तासांनंतरही ऑफीसचे फोन आणि ई-मेल यामुळे त्रस्त असतात. या विधेयकामुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेव्यतिरिक्त आणि कामाशी संबंधित सर्व बाबींसाठी कॉल आणि ईमेलला उत्तर देण्यास नकार देण्याचा अधिकार मिळेल.


मासिक पाळीची भरपगारी रजेची मागणी तर काँग्रेस खासदार कदियम काव्या यांनी सभागृहात आणखी एक विधेयक मांडले. मासिक पाळीच्या वेळी कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना काही फायदे देण्याबद्दल मेन्स्ट्रुअल बेनिफिट्स बिल, २०२४ मध्ये नमूद केलं आहे. शांभवी चौधरी (LJP) यांनी मासिक पाळीच्या काळात इतर अनेक फायदे आणि सुविधांची मागणी केली. तसेच काम करणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींना, मासिक पाळीच्या वेळी भरपगारी रजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी कायदा आणण्यात यावा अशी मागणी केली.


काँग्रेस खासदाराचे नीट सूट विधेयक : काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तामिळनाडूला NEET मधून सूट देण्यासाठी एक विधेयक मांडले. या मुद्द्यावर, तामिळनाडू सरकारने राष्ट्रपतींनी संबंधित प्रस्तावित कायद्याला मान्यता देण्यास नकार दिल्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


मृत्युदंड रद्द करण्याचे विधेयक: द्रमुक खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी देशात मृत्युदंड रद्द करण्यासाठी एक विधेयक मांडले. ही मागणी यापूर्वीही करण्यात आली होती, परंतु काही प्रकरणांमध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकारनी ही मागणी नाकारली आहे. पत्रकार सुरक्षा बिल: खासदार विशालदादा प्रकाशबापू पाटील (स्वतंत्र) यांनी पत्रकार (हिंसाचार प्रतिबंध आणि संरक्षण) विधेयक, २०२४ हे सादर केले. पत्रकारांवरील हिंसाचार रोखणे आणि त्यांची सुरक्षित योग्य असेल हे सुनिश्चित करणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे