न्यूयॉर्क : अमेरिकेत जायचे असेल, तर सोशल मीडियावर जपून पोस्ट करणे गरजेचे आहे. कारण, अमेरिकन व्हिसा मिळवताना सोशल मीडिया तपासला जाणार आहे. आता अमेरिकेने व्हिसासाठी नवे नियम लागू केले. त्यानुसार ज्यांना अमेरिकेचा एचवनबी व्हिसा आणि एच फोर व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मिडिया खात्यांची तपासणी केली जाणार आहे. हे नियम १५ डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत. एच वन बी व्हिसा आणि एच फोर व्हिसा देण्यासाठी अर्जदारांची सोशल मीडिया खाती तपासली जाणार आहेत. यामुळे ज्या अर्जदारांची खाती प्रायव्हेट असतील ती पब्लिक करावी लागणार आहे. ज्यामुळे अमेरिकन यंत्रणा सोशल मीडिया खाती तपासू शकतात. अमेरिकेविरोधातील विचारांचे समर्थन केले असल्यास व्हिसा मिळणार नाही. अमेरिकेच्या व्हिसा मंजूर करणाऱ्या विभागाकडून अर्जदारांच्या सोशल मीडियावर तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक व्हिसा अर्ज मंजूर करताना राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.