दहिसर पूर्वमधील नव्याने बनवलेल्या यशवंतराव तावडे मार्ग खोदला

नव्याने जलवाहिनी टाकण्यासाठी काँक्रिट केलेला रस्ता खोदण्याचा प्रताप


नवीन केलेला रस्ता खोदायला दिला जाणार नाही,या आयुक्तांसह अतिरिक्तांच्या वल्गना केवळ हवेतच


मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांचा विकास सिमेंट काँक्रिटद्वारे केला जात असून एकदा सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनवल्यानंतर त्यावर सेवा सुविधांचे जाळे अर्थात युटीलिटीज टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारे खोदकाम करता येणार नाही असा पावित्रा महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर कोणतेही खोदकाम करता येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतरही दहिसरमधील एल टी मार्गला जोडणाऱ्या यशवंतराव तावडे मार्गावर जल वाहिनी टाकण्याचे काम सुरु झाले आहे. त्यासाठी नव्याने बनवलेला काँक्रिटचा रस्ता चक्क खोदण्यात आल्याचे दिसून येत आहे.


दहिसर पश्चिम येथील रेल्वे मार्गाशेजारील समांतर जाणाऱ्या एल टी रोडला जोडून दिपा फॅमिली बारकडून यशवंतराव तावडे मार्ग जात आहे. हा तावडे मार्ग सिमेंट काँक्रिटचा आहे. या रस्त्याच्या एका बाजुचे सिमेंट काँक्रिटचे काम पूर्ण झाले असून एका मार्गिकेचे काम प्रलंबित आहे. परंतु ज्या मार्गिकेचे सिमेंट काँक्रिटचे काम पूर्ण झाले आहे, त्याच मार्गिकेवर चर खणून नवीन जलवाहिनी टाकण्याचे सुरु आहे. महापालिका जल अभियंता विभागाच्यावतीने मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नव्याने बनवलेला रस्ता खोदण्यात आला आहे.




महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी रस्ते कामांचे कंत्राट मंजूर केल्यानंतर ज्या रस्त्यांचा विकास केला जाणार आहे, त्या रस्त्याखालून नवीन युटीलिटीज टाकायची असेल तर रस्ते कामादरम्यान टाकली जावी अशाप्रकारच्या सूचना सर्व संबंधित खाते तथा विभागांना केले होते. त्यामुळे अत्यंत तातडीच्या दुरुस्तीचे काम वगळता नवीन कामांसाठी नव्याने बनवलेले रस्ते खोदकामाला परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट असतानाही नव्याने सिमेंट काँक्रिटीकरण केलेला यशवंतराव तावडे मार्ग खोदण्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित सहायक अभियंता (रस्ते )यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना कुणाही संपर्क होवू शकला नाही.



यशवंतराव तावडे मार्गाची स्थिती


आजवर झालेले सिमेंट काँक्रिटचे काम : ९४.७४ टक्के प्रगतीपथावर



रस्त्याची लांबी आणि रुंदी : लांबी ७६० मीटर आणि १७.३ मीटर रुंदी



सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम ९४.७४ टक्के पूर्ण



पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण



डक्टचे काम : ९६.०५ टक्के पूर्ण

Comments
Add Comment

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील

वांद्रे तलाव बनले बकाल, तलावात शेवाळयुक्त दुर्गंधी पाणी आणि कचरा

तलावाभोवतीचे सुरक्षा कठडे तुटलेले जॉगिंग ट्रॅकवरील लाद्या उखडलेल्या मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेने

मालाडकरांना छोटा 'केइएम' ची आरोग्य सुविधा, नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी