माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त


मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील महापालिका शालेय इमारती अतिधोकादायक होवून बंद करावे लागत असल्याने मुलांना वरळीतील शाळांमध्ये पाठवयाची वेळ आल्याने शिक्षण विभागावर जोरदार टिका होत आहे. त्यातील सोनावाला अग्यारी मार्गावरील जमिनदोस्त केलेल्या माहिम मोरी महापालिका शालेय इमारतीच्या पुनर्विकासाला आता सुरुवात होणार आहे. तब्बल सात वर्षांनी या शालेय इमारतीच्या बांधकामाला आता सुरुवात होणार आहे. ही शालेय इमारत तब्बल दहा मजल्यांची शाळा आहे, त्यातील सात मजल्यांपर्यंत २४ वर्गखोल्या असणार आहेत. त्यामुळे मुलांना जिना चढून न जाता लिफ्टमधून जाता येणार आहे. महापालिकेच्या शालेय इमारतींचे दहा मजल्यांपर्यंत बांधकाम करण्यात येत असले तरी मुलांना खरोखरच लिफ्टमधून ये जा करायला दिले जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे.


महापालिकेच्या माहीम येथील मोरी रोडवरील शाळा ही सर्वप्रथम २०१९मध्ये सी टू अर्थात अतिधोकादायक घोषित करण्यात आली होती. ही शाळा त्यानंतर बंद करण्यात आली आहे. आणि त्यानंतर सन २०२४मध्ये शालेय इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले. या इमारतीत मराठी, ऊर्दु आणि इंग्रजी भाषेच्या शाळा चालवल्या जात होत्या. त्यामुळे बंद करण्यात आलेल्या या शाळांमधील मुलांना आरसी मार्ग आणि न्यू माहीम शाळेत स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर छोटानी मार्गावरील महापालिका शाळा ही आधी जुलै २०२४मध्ये सी वन अर्थात धोकादायक जाहीर करण्यात आली. आणि डिसेंबर महिन्यात सीटू अर्थात अतिधोकादायक म्हणून जाहीर करून खाली करण्याचे निर्देश दिले. माहीम भागांमध्ये महापालिका शाळांची पटसंख्या चांगल्याप्रकारे असतानाही मोरी रोडची शाळा अतिधोकादायक ठरल्यानंतर पाच वर्षांनी पाडण्यात आली आणि आजही त्याठिकाणी बांधकाम सुरु झालेले नाही. या उलटत मोरी रोडला याच शाळेच्या समोरील जागेत यानंतर खासगी इमारतीचे बांधकाम सुरु होवून १५ माळ्यांचे बांधकामही झाले आहे. मग महापालिका शाळेच्या बांधकामाला विलंब का होतो असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात होता.


शालेय इमारती अतिधोकादायक झाल्याने बंद करण्यात येत असल्याने बोंबाबोंब झाल्यानंतर महापालिका पायाभूत सुविधा(शाळा) विभाग आता जागा झाला असून त्यांनी मोरी रोड महापालिका शाळेसाठी निविदा मागवून कंत्राटदाराची निवड केली आहे. या दहा मजली शालेय इमारतीच्या बांधकामांसाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी पी.बी कस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.





शालेय इमारतीचे बांधकाम:


आरसीसी तळमजला अधिक ३ जिने आणि ४ लिफ्टसह १० मजले


तळ मजला: कारपार्किंगसह इतर सुविधा


पहिला मजला: १ वर्ग खोलीसह इतर सुविधा


दुसरा मजला : ४ वर्ग खोल्या आणि भौतिकशास्त्र प्रयोगशाळासह इतर सुविधा


तिसरा मजला: ०४ वर्ग खोल्या आणि रसायनशास्त्र प्रयोगशाळासह इतर सुविधा


चौथा मजला : ०४ वर्ग खोल्या आणि जीवशास्त्र प्रयोगशाळासह इतर सुविधा


पाचवा मजला : ०३ वर्ग खोल्या आणि ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळासह इतर सुविधा


सहावा मजला : ०४ वर्ग खोल्यासह इतर सुविधा


सातवा मजला : ०४ वर्ग खोल्या आणि वैद्यकीय कक्ष गणित प्रयोगशाळासह इतर सुविधा


आठवा मजला: किड्स क्लब एरिया, स्किल सेंटर आणि २ खोल्यांसह इतर सुविध


नववा मजला : योगालय, बॅडमिंटन कोर्ट आणि इनडोअर गेमसह इतर सुविधा


दहावा मजला :इनडोअर गेम २ (टेबल टेनिस)आणि इनडोअर गेम३ (कॅरम बोर्ड) सह इतर सुविधा

Comments
Add Comment

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

वांद्रे तलाव बनले बकाल, तलावात शेवाळयुक्त दुर्गंधी पाणी आणि कचरा

तलावाभोवतीचे सुरक्षा कठडे तुटलेले जॉगिंग ट्रॅकवरील लाद्या उखडलेल्या मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेने

दहिसर पूर्वमधील नव्याने बनवलेल्या यशवंतराव तावडे मार्ग खोदला

नव्याने जलवाहिनी टाकण्यासाठी काँक्रिट केलेला रस्ता खोदण्याचा प्रताप नवीन केलेला रस्ता खोदायला दिला जाणार

मालाडकरांना छोटा 'केइएम' ची आरोग्य सुविधा, नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी