‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत!


मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी प्रथमच एकत्र येत ‘लग्नपंचमी’हे नवीन नाटक नवीन वर्षाच्या सुरुवातीला रंगभूमीवर घेऊन येत असल्याने रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही उत्सुकता आता आणखी वाढणार आहे, कारण मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी व टेलिव्हिजन, ओटीटी या क्षेत्रांमधील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत सूर्यजाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. म्हणजेच ‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाच्या माध्यमातून ती नाट्यसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘लग्नपंचमी’ हा लग्नातील विरोधाभास, भावना, विनोद आणि नात्यांचा बहुरंगी प्रवास अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने मांडणारा नवीन मराठी प्रयोग नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमृताच्या चाहत्या वर्गाला या नाटकाची उत्सुकता नक्कीच लागून राहणार आहे.


अमृताने हे नाटक करायचे का ठरवले, याबद्दल बोलताना, ती म्हणते, “मी नाटकात काम करीन असे माझ्या कधी मनातही आले नव्हते. शिवाय मला काही चांगली, आकर्षक संधीही आतापर्यंत मिळाली नव्हती. कोणत्याही नाटकासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी आणि कटिबद्धता लागते. मोठ्या प्रमाणावर सराव लागतो आणि विविध शहरांमधील प्रयोग कित्येक महिने करावे लागतात. मला ते करणे कठीण वाटत होते.”


‘लग्नपंचमी’बद्दल बोलताना ती म्हणाली की, नाटकाचा विषय आणि या नाटकाची टीम यांच्यामुळे या नाटकाकडे मी आकर्षित झाले. “एलिझाबेथ एकादशी, वाळवी यांसाख्या चित्रपटांची लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी माझा विचार या नाटकासाठी केला हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. मला त्यांच्याबरोबर आणि या नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याबरोसबर काम करायचेच होते.” ती म्हणते.

Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग