१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती


मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली. गडकरी यांनी सांगितले की, देशातील सध्याची टोल वसुली प्रणाली एका वर्षाच्या आत पूर्णपणे बंद केली जाईल आणि त्याऐवजी नवी इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली लागू करण्यात येईल. या नवीन प्रणालीमुळे महामार्गावर वाहने न थांबता, विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे.


नितीन गडकरी म्हटले की, हायवे पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने वाहन थांबवून शुल्क घेण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे देशभरातील टोल प्लाझा अदृश्य होतील आणि वाहने टोल भरण्यासाठी न थांबता वेगात पुढे जाऊ शकतील. यामुळे टोलवरील लांब रांगा आणि वेळेची बचत होईल.


सध्याच्या फास्टॅग तंत्रज्ञानावर आधारित ही नवी प्रणाली राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) अंतर्गत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केली आहे. यात आरएफआयडी आधारित फास्टॅग उपकरण वाहनाच्या विंडस्क्रीनवर (समोरच्या काचेवर) लावले जाते. वाहन टोल प्लाझातून जाताना, हे उपकरण थेट चालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापते. यामुळे रोख व्यवहार किंवा थांबण्याची आवश्यकता भासत नाही. सध्या ही नवीन प्रणाली देशभरातील सुमारे १० ठिकाणी चाचणी आणि देखरेखीसाठी लागू करण्यात आली आहे. पुढील एका वर्षात ती संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर लागू होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील