मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला. लग्नाच्या अनेक सुखद आठवणी प्राजक्ताने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.
पण चर्चा रंगली ती प्राजक्ताच्या विवाह सोहळ्यातील एन्ट्रीची, या विवाह सोहळ्याचं खास आकर्षण होतं ते म्हणजे शिव आणि गणांचं... यात प्राजक्ता आणि शंभूराज एका नंदीवर बसून मंडपात आले होते. यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यांनी विवाह सोहळ्यातील देखाव्यावर आक्षेप नोंदवला होता. देवांचा अपमान होतो आहे असेही काही लोकांचे म्हणणे होते.
पण ज्योतिषी आनंद पिंपळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत लग्नातील शिव आणि गणांच्या तसेच प्राजक्ताच्या एन्ट्री संदर्भात त्यांचे मत मांडले. ज्यांना पूर्ण माहिती नाही अशांकडूनच वाद घातला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
धर्मशास्त्रानुार जोडपं नर नारी न राहता, विवाहप्रसंगी विष्णू आणि लक्ष्मी असतात. ब्रह्मवैवर्थ पुराणात लक्ष्मी आणि विष्णूच्या विवाहात शिव आणि त्यांच्या गणांनी भाग घेतल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे हा शिवात्मक देखावा दाखवणं हे अज्ञान नसून देवांचा अपमान नसून तो क्षण पुन्हा सादर करायचा आणि प्राचीन परंपरेचं मूर्त स्वरुप समोर आणायचं हा हेतू होता. अगदी विवाह विधींमध्ये सुद्धा ब्राह्मण मंत्रोउच्चारातून शिव आणि त्याचा गणांचा उल्लेख करतात. त्यामुळे प्राजक्ताने नंदीवरुन लग्नाच्या ठिकाणी केलेली एन्ट्री वादग्रस्त नाही, असेही ते म्हणाले.