इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंडिगोच्या शेकडो उड्डाणांना रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. इंडिगोच्या या बेफिकीर कामामुळे बरेच प्रवासी एकाच ठिकाणी अडकून पडले.


इंडिगोचे एक विमान नागपूरहुन पुण्याला जाणार होते. पण ते पुण्याला न पोहोचता थेट हैदराबादला गेले. विमान हैदराबादला पोहोचलं, तेव्हा तिथे देखील त्यांना तब्बल एक तास विमानाच्या बाहेर येऊच दिलं नाही, झालेल्या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी विमानातच गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रवाशांनी विमानात गोंधळ सुरू केल्यामुळे अखेर या प्रवाशांना विमानातून बाहेर सोडण्यात आलं, नागपुरहून पुण्याला निघालेले अनेक प्रवासी अजूनही हैदरबाद विमानतळावरच अडकून पडले आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.


हाती आलेल्या माहितीनुसार नागपूरमधील प्रवाशांना इंडिगोच्या विमानाने पुण्याला जायचे होते. मात्र इंडिगोने गुरुवारी प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी नागपूर – पुणे अशी इंडिगोची फ्लाईट नियोजित होती. मात्र ती फ्लाईट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नाही, त्यानंतर रात्री एक वाजता फ्लाईटने उड्डाण घेतले. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगोच्या पायलटने आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड केलं.


हे विमान हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही. अखेरीस काही प्रवाशांनी विमानाच्या आत गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना हैदराबाद टर्मिनल्सवर विमानातून बाहेर सोडण्यात आले. अजूनही नागपूरचे अनेक प्रवासी जे पुण्याला जायला निघाले होते, ते हैदराबादमध्येच अडकून पडले आहेत. नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाराणसीवरून पुण्याला जाण्यासाठी निघालेले देखील अनेक प्रवासी सध्या हैदराबादमध्ये अडकून पडले आहेत. हैदराबाद विमानतळावर प्रचंड हाल होत असल्याची तक्रार या प्रवाशांनी केली आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी