फिनटेक कंपनी झॅगलकडून रिव्पे टेक्नॉलॉजीचे ९७ कोटीला १००% अधिग्रहण

मोहित सोमण: झॅगल (Zaggle Prepaid Services Limited) या फिनेटक व सास (SaaS) कंपनीने रिव्पे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (Rivpe Technology Private Limited) कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. ९७ कोटीला हे अधिग्रहण पूर्ण झाल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संचालक मंडळाने या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे . एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, फिनटेक कंपनीपैकी प्रसिद्ध असलेल्या स्टार्टअप कंपनी रिव्पे कंपनीचे १००% अधिग्रहण केले असून कंपनी कंज्यूमर क्रेडिट कार्ड व युपीआय आधारित या कंपनीचे अधिग्रहण केल्याने कंपनीचा विस्तार केल्याचे कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले.माहितीनुसार पहिले कंपनी २२ कोटींची गुंतवणूक या स्टार्टअप कंपनी रिव्पेमध्ये करणार असून उर्वरित ७५% गुंतवणूक कंपनी त्या कंपनीचा ब्रँड रिओ मनी (Rio.Money) मध्ये करणार आहे असे कंपनीने म्हटले. उत्पादनातील दर्जा वाढवण्यासाठी व आपल्या उत्पादनातील पोर्टफोलिओत वाढ करण्यासाठी हे अधिग्रहण (Acquisition) करण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले.


एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत,'आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत रिव्पे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांकडून २२ कोटी रुपयांपर्यंतच्या विचारार्थ ८१४२९ इक्विटी शेअर्स आणि १६४०७ अनिवार्य परिवर्तनीय (Compulsory Preference Share) पसंती शेअर्सच्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. पूर्णपणे सौम्य आधारावर जे रिव्पेच्या जारी केलेल्या आणि भरलेल्या भांडवलाच्या १००% प्रतिनिधित्व करतात' या शब्दात कंपनीने स्पष्ट केले आहे.हे अधिग्रहण १००% कॅशमध्ये होणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे शेअर खरेदी करारासह १२० दिवसांच्या आत कंपनी हा व्यवहार पार पाडणार आहे. कंपनी पायाभूत सुविधेत भर टाकण्यासाठी ७५ कोटींची भांडवली गुंतवणूक करणार आहे. खरेदी केल्यावर रिव्पे झॅगलची उपकंपनी (Subsidiary) बनेल. डिजिटल क्रेडिट कार्डसह इतकं आधुनिक फिनटेक उत्पादनात आपला पोर्टफोलिओ वाढण्याचे कंपनीने ठरवले आहे. रिव्पेने आर्थिक वर्ष २०२५ कंपनीने ०.९८ कोटींचा महसूल मिळवला होता.


झॅगलचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राज पी. नारायणम म्हणाले,'रिओ.मनीचे संपादन हा भारताला सर्वात व्यापक फिनटेक परिसंस्थेपैकी एक तयार बनविण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेतील एक धोरणात्मक आधारस्तंभ अनुरूप पडलेले पाऊल आहे. रिओ.मनी आज भारतातील दोन सर्वात परिवर्तनकारी देयक उपायांपैकी एक असलेल्या यूपीआय आणि ग्राहक क्रेडिट कार्ड यामध्ये आम्हाला अपवादात्मक क्षमता प्रदान करणारी ठरेल.'


झॅगलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोडखिंडी म्हणाले आहेत की,'रिओ.मनीची ग्राहक क्रेडिट कार्ड आणि यूपीआय व्यवसायातील क्षमता आमच्या वाढीच्या धोरणाशी अखंडपणे जुळणारी आहे. झॅगलचे ३५ लाख वापरकर्ते आणि ३६०० कॉर्पोरेट ग्राहकांचा फायदा घेऊन ताजे संपादन हे आमच्या एंटरप्राइझ खर्च व्यवस्थापन आणि वित्तीय तंत्रज्ञानातील भक्कम पायाला जमेस धरून एकत्रितपणे नवीन ग्राहक विभाग आणि बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार वाढवण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.'


रिओ.मनीच्या संस्थापक रिया भट्टाचार्य यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,'झॅगलमध्ये सामील होणे रिओ.मनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्राहक क्रेडिट कार्ड आणि यूपीआय व्यवसायामधील आमची कौशल्ये, झॅगलच्या विस्तृत वापरकर्ता आधार आणि मजबूत एंटरप्राइझ संबंधांसह एकत्रितपणे जलद प्रमाणात एक शक्तिशाली पाया तयार करतील. भविष्यात लाखो लोकांसाठी आर्थिक प्रवेश आणि सुविधा वाढवणारे प्रभावी उपाय तयार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला गती देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'


दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे दिलेल्या माहितीत एंटरप्राईजेस वाढीसाठी लागणारा खर्च, ग्राहक क्रेडिट कार्ड उत्पादन पोर्टफोलिओ वाढ, व्यापक विस्तार SaaS आधारित आर्थिक फ्लो कायम राखण्यासाठी, युपीआय डिजिटल पेमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी केला जाणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये झॅगलचा आयपीओ (Initial Public Offerings IPO) बाजारात दाखल झाला होता. ५६३ कोटींच्या या आयपीओला १२.८६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. १६४ प्राईज असलेला शेअर १६४ रूपयालाच सूचीबद्ध (Listed) झाला होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७२% निव्वळ नफा (Net Profit) मिळाला होता. तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर दुसऱ्या तिमाहीत ४२.९% वाढ झाली आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चातही इयर ऑन इयर बेसिसवर ४५.६% वाढ झाली होती. कंपनीने तिमाही निकालानंतर ईओपी (Employee Stock Options) अंतर्गत १३४४५१९६७ शेअरचे वाटप (Allotment) केले होते. त्यावेळीही कंपनीने नवीन वित्तीय उत्पादन निर्मितीसाठी निधी प्राप्त केला होता. २०११ साली कंपनीची (Zaggle) स्थापना झाली होती. आज कंपनीचा शेअर ४.०७% कोसळत ३५१.२० रूपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर १०.२४% घसरला असून इयर टू डेट (YTD) बेसिसवर ३५.५८% घसरला आहे. तर गेल्या ५ वर्षांत कंपनीने १२१.७९% परतावा गुंतवणूकदारांना दिला.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

शेअर बाजार सविस्तर विश्लेषण: आरबीआयच्या निर्णयानंतर बँक निर्देशांकात धमाका मात्र 'ही' टेक्निकल पोझिशन? सेन्सेक्स ४३७.०५ व निफ्टी १५२.७० उसळला

मोहित सोमण: रेपो दरातील कापणीनंतर बँक निर्देशांकातील जबरदस्त वाढीमुळे शेअर बाजारात अखेरच्या सत्रात वाढ झाली

रिलायन्स इंडस्ट्रीजला एस अँड पी ग्लोबलकडून कौतुकाची थाप, BBB+ वरून A- वर वाढ

मुंबई: जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) वरील श्रेणीत (Ratings) मध्ये