मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवून घरातील स्पर्धकांना रोमांचित केले. यंदाची ट्रॉफी विशेष आहे कारण तिचा लूक अगदी तसा आहे जसा सलमान खान शोच्या प्रोमोमध्ये पोज देताना दिसतो.
पाच फायनलिस्ट जाहीर
फायनल फेरीसाठी निवडले गेलेले पाच स्पर्धक आहेत गौरव खन्ना, अमल मलिक, तान्या मित्तल, फरहाना आणि प्रणित मोरे. मालतीची शोमधून एक्झिट झाली. असेम्बली रूममध्ये बिग बॉसने यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीचं अनावरण केलं. दोन हात जोडलेल्या डिझाइनमधील ही खास ट्रॉफी पाहताच स्पर्धकांना आनंद गगनात मावेनासा झाला.
बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. यात विजेत्याला मिळणार आहे एक सोनेरी स्वप्नांची ट्रॉफी.. खास डिझाईन केलेली आणि विजेत्यांना अविस्मरणीय ठरेल अशी ही ट्रॉफी आहे. ही ट्रॉफी एक खास प्रतीक आहे. यंदाच्या सीझनची थीम "घरवालों की सरकार" अशी आहे. ट्रॉफीचा वरचा भाग दोन हातांच्या आकाराचा आहे जो बोटांनी एकत्र जोडलेला आहे. ही ट्रॉफी आहे सिल्व्हर क्रॉस हातांची आणि हिऱ्यांनी मढवलेली आहे. त्यामुळे ती चमकदार दिसतेय. याच हातांच्या खाली "BB" हा लोगो आहे. ही आकर्षक अशी ट्रॉफी घराच्या आकारासारखी आहे. महत्त्वाचं म्हणजे ही ट्रॉफी सलमान खान ज्याप्रमाणे हात जोडतो त्या प्रतिमेशी मिळतीजुळती आहे.
आता लक्ष सात डिसेंबरच्या रात्रीकडे...रात्री नऊ वाजता बिग बॉसचा लाईव्ह फिनालेचा महाप्रसंग रंगणार आहे. त्यातच या आकर्षक ट्रॉफीवर नाव कोण कोरणा र? स्टारडम कोणाच्या वाट्याला येणार? बस... काही तास शिल्लक आहेत...आणि त्यानंतर ठरणार आहे बिग बॉस सीझन १९ चा खरा बॉस...