नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर, अंबरनाथमध्ये शिवसेनेला दिलासा; भाजपाला मोठा धक्का

अंबरनाथ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाल्याचं स्पष्ट होत आहे, तर भाजपाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.


फक्त नगराध्यक्ष आणि ९ वॉर्डांसाठीच लागू सुधारित कार्यक्रम


नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार फक्त नगराध्यक्ष पद आणि ९ वॉर्डांसाठीच सुधारित कार्यक्रम लागू राहणार आहे.नव्या अर्जांना परवानगी नसेल. फक्त मंजूर अर्जवाल्यांनाच अर्ज मागे घेण्याची मुभा दिली आहे. यामुळे आधीच घेतलेले निर्णय कायम राहणार आहेत.


भाजपाच्या ५ उमेदवारांचे अर्ज अवैध – मिळणार नाही पुनर्जीवन


छाननीत भाजपाच्या ५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. निवडणूक स्थगित झाल्यानंतर नव्याने अर्ज भरण्याची परवानगी मिळेल अशी BJP मध्ये चर्चा होती, ज्यामुळे ५ पैकी २ उमेदवारांना संधी मिळू शकते अशी अपेक्षा होती.
मात्र सुधारित कार्यक्रमाने हा मार्ग बंद झाला आहे. ज्यांचे अर्ज बाद आहेत ते बादच राहणार – हे स्पष्ट झाले आहे.


६ ब आणि ७ अ वॉर्डांचे अर्जही बादच


६ ब आणि ७ अ या वॉर्डांच्या निवडणुका आधी नव्याने जाहीर झाल्या होत्या.या दोन्ही वॉर्डांतील BJP उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले गेले होते.आताच्या निर्णयामुळे हे अर्ज पुनर्जीवित होणार नाहीत आणि नव्याने अर्जही दाखल करता येणार नाहीत.


भाजपाला मोठा धक्का – शिवसेना फायद्यात


निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेसाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे.उलट, भाजपाच्या अनेक वॉर्डांमध्ये उमेदवार नसण्याची परिस्थिती कायम राहणार आहे, ज्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे.


मतदानाची तारीख जाहीर


न्यायालयाचा निकाल उशिरा आल्याने २ डिसेंबरची निवडणूक स्थगित करण्यात आली होती.


आता नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे


मतदान : २० डिसेंबर २०२५
मतमोजणी : २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून


सुधारित कार्यक्रमानुसार —


२४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी तसेच ७६ नगरपरिषद व नगरपंचायतीमधील १५४ सदस्यपदांसाठी निवडणूक कार्यक्रम राबवला जाईल.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

गोवा अग्निकांडाहबद्दल महत्त्वाची अपडेट! लुथरा ब्रदर्सच्या कोठडीत वाढ

पणजी: गोव्यातील मापुसा न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या पोलिस

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ