माँ नर्मदा...

!! नमामि देवी नर्मदे!!


नर्मदा परिक्रमा म्हणजे एक अध्यात्मिक अनुभूती आहे. ही परिक्रमा म्हणजे नर्मदा मैय्याभोवती नुसते गोल फिरणे नाही, तर परिक्रमा म्हणजे स्वतःला अंतर्मुख करून घेण्याचा प्रवास, स्वतःच स्वतःशी करून घेतलेली अध्यात्मिक ओळख. तसेच ईश्वरी शक्तीवर असलेला दृढ विश्वास आणि नर्मदा मैय्याला केलेले संपूर्ण समर्पण.


देव उठनी एकादशीपासून नर्मदा मैय्याची परिक्रमा यात्रा देखील सुरू झाली आहे. आता, नर्मदा मैय्याच्या काठावर पुन्हा एकदा “नर्मदे हर” चा प्रतिध्वनी ऐकू येईल. दरवर्षी, देश-विदेशातील लाखो भाविक या पवित्र यात्रेत सहभागी होतात. काही लोक पायी, काही गटाने तर काही वाहनाने नर्मदा मैय्याची परिक्रमा करतात, पावसाळ्यात परिक्रमा चार महिने थांबवली जाते. देव उठनी एकादशी येताच नर्मदा यात्रा पुन्हा सुरू होते. यावर्षी, एक नोव्हेंबरपासून, हजारो भाविक पुन्हा एकदा नर्मदा मैय्याच्या दोन्ही तिरांवर पायी यात्रेला निघाले आहेत; परंतु प्रत्येक यात्रेकरूंनी आपल्यासोबत तीन आवश्यक वस्तू सोबत बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्याशिवाय प्रवास अपूर्ण मानला जातो.


१. पाण्यासाठी छोटी बाटली :
प्रत्येक यात्रेकरूने सोबत एक पारदर्शक पाण्याची छोटी बाटली आपल्यासोबत ठेवावी. प्रवासाच्या सुरुवातीला ही बाटली नर्मदा मैय्याच्या पाण्याने भरून घ्यावी. वाटेत नदीला भेट देणे किंवा त्यात स्नान करणे शक्य नसल्यास, हे पाणी शिंपडल्याने, नर्मदा मैय्यामध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. या बाटलीतील पाणी देखील बदलले जाते. आपण जेव्हा एखाद्या शंकराच्या मंदिरात जातो तेव्हा हे बाटलीतील पाणी जल म्हणून शिवलिंगावर चढवतात आणि मैय्याचे दुसरे पाणी त्यात भरून घेतात. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण मैय्याच्या किनाऱ्याजवळून जात असू.


२. कमंडलू: परिक्रमा करणाऱ्यांना त्यांच्यासोबत एक कमंडलू (कडीचा डब्बा किंवा किटली) बाळगणे देखील आवश्यक आहे. परिक्रमा दरम्यान पूजेसाठी, पाणी पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही पाण्याशी संबंधित सर्व कामांसाठी या कमंडलूचा वापर केला जातो. त्या व्यतिरिक्त इतर कोणीही दिलेल्या कोणत्याही भांड्याचा वापर करू नये. जर कधी चुकून आपण दुसऱ्याचे भांडे वापरले तर ते स्वतःच धुवावे.


३. दंड : दंड (काठी) ही आवश्यक वस्तूंपैकी एक अतिशय महत्त्वाची वस्तू मानली जाते. त्याला यात्रेकरूंचा “तिसरा पाय” म्हणतात. ते केवळ चालताना आधार देत नाहीत, तर त्याला व्यास दंड असेही म्हणतात. असे मानले जाते की, महर्षी वेद व्यासांनी एकदा याच काठीने नर्मदेच्या प्रवाहाची दिशा बदलली होती. जेणेकरून उत्तर आणि दक्षिण किनारे एकत्र येतील आणि यज्ञ पूर्ण होईल. चढ-उतार आल्यावर, पाण्यातून चालताना पाण्याचा अंदाज घेण्यासाठी, जंगलातून चालताना या दंडाचा उपयोग होतो. म्हणूनच नर्मदा परिक्रमा करताना या तिन्ही वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत. परिक्रमेत तुम्हाला या तिन्ही वस्तूंची पूजा करावी लागते. नर्मदा परिक्रमा ही केवळ तीर्थयात्रा नाही, तर श्रद्धा, संयम आणि अध्यात्माचा मार्ग आहे. भाविक नर्मदा नदीकाठी असलेल्या गावांमधून, जंगलांमधून आणि घाटांमधून दिवसरात्र चालतात.


प्रत्येक थांब्यावर, “नमर्दे हर” या मंत्रासह माता नर्मदेचा महिमा गायला जातो. दंड, कमंडलू आणि नर्मदा मैय्याचे पाणी बाटलीत घेऊन जाणे हे केवळ धार्मिक परंपरांचे पालन दर्शवत नाही, तर संपूर्ण प्रवासात शिस्त आणि भक्ती देखील राखते.


नर्मदे हर... नर्मदे हर... नर्मदे हर

Comments
Add Comment

भाग्यविधाता

सद्गुरु वामनराव पै, जीवन संगीत आपला जो विषय आहे, अंधारातून प्रकाशाकडे त्याचा सरळ अर्थ आहे. तो म्हणजे अज्ञानातून

जैमिनीमुनी (पूर्वार्ध)

डॉ. अनुराधा कुलकर्णी, भारतीय ऋषी …anuradh.klkrn@gmil.com फार पूर्वी सर्व वेदमंत्र एकत्रच होते. त्या सहस्त्रावधी मंत्रात काहीत

मोह

प्राची परचुरे-वैद्य, आत्मज्ञान भाणूस जन्माला आला की त्याचे आयुष्य सुरू होते ते अगदी मरेपर्यंत. त्या

गुरू : एक किल्ली मुक्तीची

ऋतुजा केळकर, ऋतुराज गुरू प्रकाशी ज्ञानदीप, शिष्य हृदयी उजळतो । संसारसागर पार करावा, श्रद्धा विश्वास आधारतो

अध्यात्मिक जागृतीचे प्रतीक... कुंकुमतिलक

अर्चना सरोदे, मानाचा गाभारा हिंदू धर्मात विविध प्रकारच्या रुढी, परंपरा पाळल्या जातात. हिंदू धर्मात कपाळावर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात