फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर संघाची धुरा असणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या दृष्टीने ही पाच सामन्यांची मालिका महत्त्वाची असणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने एकाही मालिकेत हार पत्करलेली नाही. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने दमदार कामगिरी केली आहे. आता भारतापुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. या टी-२० मालिकेसाठी भारताने आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर ९ डिसेंबरपासून कटकमध्ये टी-२० मालिकेला सुरूवात होईल. तर अखेरचा सामना १९ डिसेंबरला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.
सलामीसाठी आता अभिषेक शर्माचे स्थान कायम आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. पण हार्दिक काही दिवसांपूर्वी या दुखापतीमधून सावरला होता. त्यामुळे त्याला या संघात स्थान मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण यावेळी हार्दिकला भारताच्या संघात स्थान मिळाले आहे. या संघात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांचे स्थानही कायम राहीले आहे. या संघात दोन यष्टीरक्षकांना संधी दिली आहे, पण ऋषभ पंतला मात्र संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या संघात संजू सॅमसनला संधी दिली आहे, त्याचबरोबर जितेश शर्मा हा दुसरा यष्टीरक्षक संघात असेल. अष्टपैलू खेळाडूंमध्ये यावेळी अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची निवड करण्यात आली आहे. या संघात वरुण चक्रवर्तीलाही संधी दिली आहे. फिनिशरच्या भूमिकेत असणाऱ्या रिंकू सिंहची या संघात निवड करण्यात आलेली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या संघात असणार आहे. शुभमन गिलला यावेळी संघात स्थान देण्यात आले आहे. टी-२० मालिकेपूर्वी शुभमन गिल पूर्णपणे फिट झाल्यास त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड केली जाईल. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधून गिलचे फिटनेस प्रमाणपत्र मिळण्यावर त्याचं खेळण अवलंबून असल्याचं बीसीसीआयने सांगितले आहे. टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० सीरिज वेळापत्रक :
पहिला टी-२० - ९ डिसेंबर, बारबती स्टेडियम, कटक
दुसरा टी-२० - ११ डिसेंबर, महाराजा यादवेंद्र सिंघ इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर
तिसरा टी-२० - १४ डिसेंबर, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
चौथा टी-२० - १७ डिसेंबर, भारत रत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
पाचवा टी-२० - १९ डिसेंबर, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद