सलग चौथ्यांदा IEX शेअर सुसाट आज २% पातळीवर उसळला 'या' महत्वाच्या कारणांमुळे

मोहित सोमण: आयईएक्स (IEX) शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात एक्सचेंजच्या सकारात्मक बातमीनंतर गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला. शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने सत्र सुरुवातीला आजही १ ते २% उसळला होता. सकाळच्या सत्रात सकाळी ११.१४ वाजेपर्यंत शेअर ०.१६% उसळत १४९.१३ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. आयईएक्स (Indian Energy Exchange) एक्सचेंजची संबंधित कंपनी आयजीएक्स (Indian Gas Exchange Limited IGX) कंपनीच्या २ डिसेंबरला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आयपीओला मान्यता मिळाल्याने शेअर गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात उसळला आहे. यापूर्वीही बैठकीपूर्वी एक दिवस १ डिसेंबरला कंपनीचा शेअर ५% उसळला होता. आजही ती रॅली कायम राहिली असून कंपनीने काही क्षणापूर्वी आपल्या इलेक्ट्रिसिटी टेड्रिंग व्हॉल्यूम (Trading Volume) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १७.७% वाढल्याने ही संख्या ११४०९ एमयुवर पोहोचले असल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले. ज्याचा परिणाम म्हणून शेअर आज १ ते २% उसळला होता.


नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, देशाचा ऊर्जेचा वापर १२३.४ BUs पर्यंत पोहोचला, जो मागील वर्षाच्या तुलनेत जवळजवळ १% कमी आहे. वाढलेल्या जलविद्युत, पवन आणि सौरऊर्जा निर्मितीमुळे एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर पुरवठा तरलता (Support Liquidity) वाढली आहे.या वाढीमुळे आयईएक्स आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की,'ज्यामुळे DAM आणि RTM किमतींमध्ये घट झाली. बाजारातील किमती पुढील दिवशी स्पष्ट होत आहेत. नोव्हेंबर '२५ मध्ये ३.०७ रुपये/युनिट असलेला बाजार वार्षिक ६.९% ने घसरला. त्याचप्रमाणे नोव्हेंबर '२५ मध्ये ३.१४ रुपये/युनिट असलेल्या रिअल टाइम मार्केटमधील किंमत वार्षिक ९.२% ने घसरली.


माहितीनुसार,एक्सचेंजमधील पुढील REC ट्रेडिंग सत्रे १० डिसेंबर '२५ आणि ३१ डिसेंबर '२५ रोजी नियोजित आहेत. याशिवाय अन्य अनेक आयपीओमध्ये मूळ कंपनीच्या विद्यमान भागधारकांसाठी काही गुंतवणूकीचा वाटा आरक्षित असतो. तथापि, आयईएक्स असोसिएट, आयजीएक्सच्या आयपीओसाठी अर्ज करताना आयईएक्स भागधारक प्राधान्य शेअर्स मोड वापरू शकतात की नाही हे अद्याप कंपनीने स्पष्ट केलेले नाही.


यापूर्वी आयईएक्स शेअरची किंमत ५% १ डिसेंबरला वाढली होती. त्यापूर्वीही गेल्या सहा महिन्यांत शेअर २७% घसरली असून एका वर्षात या शेअरची किंमत १७% घसरली आहे, परंतु गेल्या पाच वर्षांत मात्र शेअरची १०२% वाढली आहे. या ५% वाढीमुळे शेअरला आणखी तमजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूमचा पाठिंबा मिळाला. सोमवारी १ डिसेंबरला बीएसईवर IEX शेअर्स ५.७०% पर्यंत वाढून १३९.६५ वर पोहोचले. त्यादिवशी कंपनीचे सुमारे १ कोटी इक्विटी शेअर्स हस्तांतरित झाले.


मार्केट कपलिंग प्रकरणात सुरू असलेल्या कायदेशीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयईएक्स IEX शेअर्समध्ये वाढ झाली. केंद्रीय विद्युत नियामक आयोगाच्या (CERC) मार्केट कपलिंग नियम लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध IEX च्या याचिकेवर सुनावणी करताना अपीलीय विद्युत न्यायाधिकरणाने (APTEL) २८ नोव्हेंबर रोजीच्या आपल्या आदेशात पुढील सुनावणी ६ जानेवारी २०२६ रोजी निश्चित केली आहे.

Comments
Add Comment

Nashik : सिंहस्थाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज ! ‘कुंभ भक्ती संगम’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela) सांस्कृतिक नांदी आजपासून होत

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड