महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी विणलेला चित्रपट येत्या महिला दिनी म्हणजेच ६ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई-मुलींच्या नात्यात दडलेल्या न सांगितलेल्या भावना, आठवणी आणि काही अंतर्मुख करणाऱ्या क्षणांवर आधारित ही कथा आहे. महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून स्त्रीमनाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे.
‘तिघींच्या जगण्यातलं चौथं पान’ उलगडत असताना या तिघींमधलं नातं, त्यांचे आयुष्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन आणि बदलत्या काळातली भावनिक चढ-उतार यांचा सुंदर वेध दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनी घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासह नेहा पेंडसे बायस व सोनाली कुलकर्णी या चित्रपटात दिसणार आहेत.


दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, ‘तिघी’ हा आई-मुलींच्या नात्याचा चित्रपट असून त्यांच्या आतल्या आवाजांचा प्रवास आहे. आपण ज्या भावना दैनंदिन आयुष्यात व्यक्त करू शकत नाही, त्या सगळ्या या कथेतून उलगडतात. येत्या महिला दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.’


या चित्रपटाचे निर्माते शार्दूल सिंह बायस म्हणतात, “आई-मुलीचे नाते खूप खास असते. आपण नेहमी देत असलेल्या प्रेमाच्या, त्यागाच्या आणि न बोलता केलेल्या काळजीच्या गोष्टी प्रत्येक घरात पाहायला मिळतात. ‘तिघी’ ही त्याच घराची, त्याच नात्यांची गोष्ट आहे. हा चित्रपट प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबाशी जोडून ठेवेल, याची मला खात्री आहे.’’


सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्नील भंगाळे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत