आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज


आमिर खानचा नवीन धमाकेदार गुप्तहेर चित्रपट हॅपी पटेल ची घोषणा अखेर करण्यात आली आहे. हा चित्रपट वीर दासच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा महत्त्वाचा टप्पा ठरतो. ज्यात वीर दास आणि मोना सिंग मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. शीर्षक जितकं मजेदार आहे, तसंच मेकर्सनी रिलीज केलेलं अनाउन्समेंट व्हिडिओही मजेदार आहे. ज्यात आमिर खान आणि वीर दास दिसतात. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होत असलेला दिग्दर्शक वीर दासचा 'हॅपी पटेल' हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


हॅपी पटेल ची घोषणा अगदी हटके आणि मजेशीर पद्धतीने करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये आमिर खान, वीर दासला विचारताना दिसतात की तो आपल्या फिल्ममध्ये अ‍ॅक्शन, रोमांस आणि अगदी आयटम नंबरही कशा अंदाजात दाखवणार आहे. आमिरला सतत याची चिंता वाटताना दाखवलं आहे की प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतील; तर दुसऱ्या बाजूला व्हिडिओतील इतर लोक चित्रपटाची प्रशंसा करताना दिसतात. त्यांच्या संभाषणातील हा मजेशीर विरोधाभास संपूर्ण अनाउन्समेंटला अधिक मनोरंजक बनवतो. इतकं नक्की की एकदम वेगळ्या प्रकारचा सिनेमा येतो आहे.





सर्वात खास म्हणजे, आमिर खान प्रोडक्शन्स नेहमीच हटके आणि अनोख्या कथा अत्यंत सर्जनशीलतेने सादर करत आलं आहे. लगान, तारे जमीन पर, दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार सारख्या अविस्मरणीय चित्रपटांनंतर, ही फिल्मही वेगळ्या सिनेमाचा अनुभव देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. यावेळी ते प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन वीर दाससोबत काम करत आहेत—ज्यांनी केवळ जगभरात आपली कॉमेडी स्पेशल्स सादर केली नाहीत, तर गो गोवा गॉन, बदमाश कंपनी आणि दिल्ली बेली सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. हॅपी पटेल हा वीर दासचा दिल्ली बेली नंतर आमिर खान प्रोडक्शन्ससोबतचा दुसरा कोलॅबोरेशन आहे.


Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत