Goregoan Traffic : वाहतूक कोंडीत अडकून रुग्णाने रुग्णवाहिकेतच जीव सोडायचा का?

गोरेगावमधील भाजपाच्या माजी नगरसेविकेचा प्रशासनाला संतप्त सवाल


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल प्रक्रिया केंद्राला जोडणाऱ्या मलनिस्सारण वाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. आधीच या परिसरातील दोन रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात केल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यातच मलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू केल्याने स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच स्थानिकांसह बस अडकून शाळकरी मुलांचा आणि रुग्णवाहिकांचा मार्ग अडला जात असल्याने स्थानिक भाजपा नगरसेविका प्रिती सातम यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णाने वाहतूक कोंडीत अडकून रुग्णवाहिकेतच जीव सोडायचा का असा सवाल करत जोवर आधी हाती घेतलेल्या रस्त्याची कामे पूर्ण होत नाही, तोवर हे काम करू देणार नाही, असा दम भरला. हे काम त्वरीत बंद करावे असे सांगत प्रशासनाला हाती घेतलेले काम स्थानिकांच्या मागणीनुसार बंद करायला लावले.



गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर रोडवर मलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदून एक मार्गिका करण्यात आल्याने यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. याच परिसरात दोन रस्त्यांची कामे सुरू असल्याने आरे भास्कर हा एकमेव वाहतुकीसाठी होता. पण तिथेही खोदकाम करण्यात आल्याने स्थानिकांना वाहतूक कोंडी मुळे होणारा त्रास लक्षात घेत स्थानिक भाजपच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी मल जल प्रक्रिया केंद्राचे अधिकारी, पी दक्षिण विभागाचे अधिकारी तसेच कंत्राट कंपनीचे अधिकारी यांना घटनास्थळी बोलावत प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे स्थानिकांना काय होतो, हे याची देही, याची डोळा दाखवून दिले. आणि स्थानिकांचा विचार न करता कसे चुकीच्या पद्धतीने काम केले दाखवून दिले.


या परिसरात आधीच दोन रस्ते खोदल्याने याच मार्गावरून वाहतूक होत असल्याने, तिथेही खोदकाम होत असल्याने नागरिकांनी चालायचं कसं असा सवाल करत सातम यांनी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शाळेचे बस, बेस्ट बस आणि रुग्ण वाहिका तसेच इतर वाहनांना यांना १०० ते १५०मीटर मीटरचा टप्पा गाठायला अर्धा तास लागतो. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय करून महापालिकेचे अधिकारी कोणतेही नियोजन न करता कंत्राटदाराने थेट खोदकाम सुरू केल्याने स्थानिकांची आणि शालेय मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे काम त्वरीत थांबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.


सुट्टीत हे काम केले असते तर शालेय मुलांची आणि लोकांची गैरसोय झाली नसती... या रस्त्यावरील काम पूर्ण झाल्यावर इतर दोन रस्त्यांच्या कामाला हात घालता आला असता... आज वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकून पडते, त्यांना जायला मार्ग नाही. मग त्यातील रुग्णाने वेळेत उपचारासाठी न पोहोचल्याने मारायचे का? महापालिका प्रशासनाला अशी रुग्णवाहिका अडकवून ठेवत रुग्णाला मारायचे का? मुले शाळेत उशिरा पोहोचल्याने त्यांच्या परीक्षा बसवायच्या? विकास कामाला आणि या प्रकल्पाला विरोध नाही, पण वाहतुकीचे योग्य नियोजन करून स्थानिकांची गैरसोय होणार आणि वाहतूक कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने प्रकल्पाचे काम केल्यास, स्थानिकांना विचारात घेऊन काम न केल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेवटी जिथे नागरिकांना त्रास होईल तिथे प्रशासनाने आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

राज्यात २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झाले मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल (२ डिसेंबर) मतदान पार पडले. राज्यातील नगरपरिषदा व

Jay Pawar Rutuja Patil wedding : खास 'वऱ्हाड' बहरीनला! जय पवार-ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण; विदेशात रंगणार शाही सोहळा

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या