RBI Update: एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेला Domestic Systematically Important (D-SIBs) महत्वाचा दर्जा जाहीर

मोहित सोमण: आरबीआयच्या वतीने डी एस आय बी (Domestic Systematically Important Banks) यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्या माहितीनुसार, या बँकिंग क्षेत्रातील प्रभावी बँका एसबीआय (State Bank of India), आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या बँकाना आरबीआयचकडून प्राधान्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आरबीआयच्या बँकेच्या नव्या वेटेजनुसार संबंधित बँकांना सीईटी १ (Common Equity Tier 1) नियम लागू झाला असून नव्या नियमानुसार आपल्या भांडवलातील अतिरिक्त कॅपिटल कंझरवेशन बफर (CCB) निधीची तरतूद वाढवावी लागणार आहे. त्यामुळे या बँकेना आपल्या भांडवली गुंतवणूकीतील वेटेज वाढवल्याने अधिकचा निधीची बफर म्हणून तरतूद करावी लागेल.


या बकेटमध्ये किती दर निश्चित करण्यात आले?


अतिरिक्त CET 1 तरतूद - आरडब्लूए (Risk Weighted Assets RWAs)


बकेट ४- एसबीआय - १%


एचडीएफसी बँक - ०.४०%


आयसीआयसीआय बँक - ०.२०%


रिझर्व्ह बँकेने २२ जुलै २०१४ रोजी 'घरगुती (Domestic) सिस्टिमली इम्पॉर्टंट बँकांशी (D-SIBs) व्यवहार करण्यासाठी फ्रेमवर्क जारी केले होते, जे नंतर २८ डिसेंबर २०२३ रोजी अपडेट करण्यात आले.


या नव्या अनुपालनातील (Compliance) D-SIB फ्रेमवर्कनुसार रिझर्व्ह बँकेने २०१५ पासून D-SIB म्हणून नियुक्त केलेल्या बँकांची नावे उघड करावीत आणि त्यांच्या सिस्टिमिक इम्पॉर्टन्स स्कोअर (SIS) वर अवलंबून या बँकांना योग्य बकेटमध्ये ठेवावे असे निर्देश बँकेने दिले होते. D-SIB ज्या बकेटमध्ये ठेवला आहे त्यावर आधारित, त्यावर अतिरिक्त CET1 आवश्यकता लागू करावी लागेल. जर भारतात शाखा असलेली परदेशी बँक ग्लोबल सिस्टिमली इम्पॉर्टंट बँक (G-SIB) असेल, तर तिला G-SIB म्हणून लागू असलेल्या भारतात अतिरिक्त CET1 भांडवली अधिभार (Capital Additional) निधी राखावा लागेल जो भारतातील तिच्या आर डब्ल्यूए (जोखीम आधारित मालमत्ता (RWAs) च्या प्रमाणात असेल.


रिझर्व्ह बँकेने २०१५ आणि २०१६ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेला डी-एसआयबी म्हणून घोषित केले होते तर २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेसह एचडीएफसी बँकेला डी-एसआयबी म्हणून वर्गीकृत केले गेले होते. सध्याचे अपडेट ३१ मार्च २०२५ रोजी बँकांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे.

Comments
Add Comment

भारतात रे-बॅन मेटा (जेन २) स्मार्टग्लास लाँच व्हिडिओ कॅप्‍चरसह इतर फिचर्स उपलब्ध लवकरच चष्म्यातून युपीआय व्यवहार शक्य होणार

मुंबई: आजपासून भारतात रे-बॅन मेटा (Gen 2) एआय ग्‍लासेस् उपलब्‍ध असणार आहेत. ज्‍यामध्‍ये व्हिडिओ कॅप्‍चर क्षमता,

Jay Pawar Rutuja Patil wedding : खास 'वऱ्हाड' बहरीनला! जय पवार-ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण; विदेशात रंगणार शाही सोहळा

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार

महाराष्ट्र ग्रामीण बँकेला दुसऱ्या अनुसूचित यादीत स्थान आरबीआयची घोषणा

मोहित सोमण: महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आरबीआयच्या दुसऱ्या सूचीत (Second Schedule of RBI Act 1934) आपले स्थान टिकविण्यात यश मिळवले

आजपासून वित्तीय पतधोरण समितीची बैठकीला सुरूवात परवा घेणार आरबीआय घेणार मोठा निर्णय

मोहित सोमण: आजपासून वित्तीय पतधोरण समितीच्या (Monetary Policy Committee MPC) तीन दिवसीय बैठक सुरु झाली आहे. परवा सकाळी ५ डिसेंबरला

रूपयात आंतरराष्ट्रीय दबावामुळे लाजिरवाणी घसरण! प्रति डॉलर रूपया ९० रूपये पार

प्रतिनिधी: आज इतिहासात प्रथमच जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेचा फटका बसल्याने रूपयाने ९० रूपयांचा आकडा प्रति ग्रॅम

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर