Devendra Fadanvis : 'राजकीय पर्यावरणवाद्यां'कडून कुंभमेळ्याच्या आयोजनात खोडा घालण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप!

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता भव्यदिव्य आयोजन करणार


मुंबई : “नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पर्यावरणवाद्यांकडून सुरू आहे. मात्र, कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता त्याचे भव्यदिव्य आयोजन केले जाईल”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, कुंभमेळा आणि पर्यावरण हे दोन्ही राज्य सरकारसाठी महत्त्वाचे विषय आहेत. मी, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे असतील, आमच्यापैकी कोणाचेही हे मत नाही, की अशाप्रकारे झाडे तोडली गेली पाहिजेत. प्रयागराजच्या कुंभमेळ्याच्या तुलनेत नाशिकचा कुंभमेळा फक्त ३०० ते ३५० हेक्टर जागेवर होतो, तर प्रयागराजमध्ये १५ हजार हेक्टर जागा उपलब्ध आहे. २०१५-१६ च्या गुगल मॅपवर पहा, या जागेवर कोणतीही झाडे दिसत नाहीत. महाराष्ट्र सरकारच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत ही झाडे लावली गेली. आता या जागेवर घनदाट झाडे उभी राहिल्याने साधुग्राम तयार करण्यात अडचणी येत आहेत”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सरकार कमीत कमी झाडे तोडण्याचा, त्यांना पुनर्रोपित करण्याचा किंवा अन्य मार्गांचा विचार करत आहे. परंतु, विनाकारण यासंदर्भात चळवळ उभारण्याचे काम काही लोकांनी सुरू केले आहे. काही लोक राजकीय कारणांनी पर्यावरणवादी बनलेले आहेत," अशी टीका त्यांनी केली. कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणारा उत्सव असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, अशा उपाययोजना राबवल्या जातील. काही लोकांना कुंभमेळ्यात अडथळे यावेत असे वाटत आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.



अतिवृष्टीबाबत केंद्राला प्रस्ताव का पाठवला नाही?


अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, अशी माहिती कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. याविषयी स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विधिमंडळ किंवा संसदेच्या अधिवेशनातील प्रश्नोत्तरे ही ३५ दिवस आधी सादर केलेली असतात. महाराष्ट्र सरकारचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला गेला असून, केंद्राने दोनवेळा पथकं राज्यात पाठवली आहेत. या पथकांनी देखील याबाबतचा अहवाल केंद्राकडे पाठवला आहे. मात्र, पायाभूत सुविधांच्या नुकसानीबाबतची पाहणी अद्याप झालेली नाही. केंद्राने सांगितले होते की, आधी कृषी पथक पाहणी करेल आणि नंतर पायाभूत सुविधांची पाहणी होईल. ही टीम पुढच्या आठवड्यात येणे अपेक्षित आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.



७५ टक्के नगरपंचायत आणि नगर परिषदा जिंकू - देवेंद्र फडणवीस


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत आलबेल नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे, याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांनी हा निर्णय घेतला, की जेथे शक्य आहे, तेथे महायुती म्हणून निवडणूक लढवावी. ज्या ठिकाणी शक्य नसेल, तेथे कार्यकर्त्यांच्या कलानुसार निर्णय घ्यावा. शेवटी कार्यकर्ता जेव्हा पक्षासाठी मेहनत घेतो, तेव्हा त्याला हेही अपेक्षित असते, की पक्षाने आपला विचार करावा. त्यामुळे आम्ही तिन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या कलाने जाण्याचा निर्णय घेतला. प्रचारातही आम्ही उतरलो. मी मुख्यमंत्री असून देखील १० हजार मतदार असलेल्या विभागात प्रचाराला गेलो. कारण तेथे कार्यकर्ता निवडणूक लढवत होता. एकंदरीत ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवली गेली. एक-दोन ठिकाणी तणाव झाला, त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली. मला वाटते, की ७५ टक्के नगरपंचायत आणि नगर परिषदा महायुतीमधील तिन पक्ष जिंकू”, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



फडणवीस आणि माझ्यात अबोला नाही - एकनाथ शिंदे


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निवडणुकांबाबत प्रतिक्रिया दिली. काँग्रेसने सत्ताधाऱ्यांकडून बोगस मतदार आणले गेल्याचा आरोप केला असता, त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, "काँग्रेस इतके दिवस होती कुठे? प्रचारात तर दिसलीच नाही. त्यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी आता कारणं शोधण्यास सुरुवात केली आहे." फडणवीस आणि शिंदे यांच्यात अबोला असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, "इतका वेळ आम्ही सोबत आहोत, त्यात कुठे अबोला दिसला का? माध्यमांनी याविषयी कंड्या पिकवल्या, पतंगबाजी केली", असा टोला देखील त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून

निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

कोणी परदेशातून, कोणी घोड्यावरुन, कोणी गब्बरसिंहच्या वेशात आलं पण मतदान करुन गेलं, नवरदेवानं लग्नाआधी मतदान केलं

मुंबई : राज्यातल्या २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक