मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार, याबाबतचा निर्णय आज (बुधवार) जाहीर झाला आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) बैठकीत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. हे अधिवेशन ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या आठवडाभराच्या कालावधीत चालणार आहे. बैठकीत सर्वानुमते या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कालावधीत राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, वादविवाद आणि महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.
राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल (२ डिसेंबर) मतदान पार पडले. राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २६४ ...
अधिवेशनाची तारीख निश्चित झाल्यामुळे आता प्रशासकीय पातळीवर तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या रणनीतीच्या तयारीला वेग येणार आहे. या आठवडाभरात राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.