रणवीर रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) उत्तम अभिनयाची चुणूक 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या सिनेमांमधून सर्वांनी पाहिली आहे. त्याचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकले नसले तरी, आता त्याच्या आगामी सिनेमा 'धुरंधर' (Dhurandhar Movie) कडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा बहुप्रतिक्षित सिनेमा ५ डिसेंबर रोजी देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून, यातून चित्रपटानं आधीच कोट्यवधी रुपये कमावले आहेत. ही कमाई पाहता, 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारी बाब म्हणजे, यात अनेक प्रमुख कलाकार झळकणार आहेत. अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जातंय, ज्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाभोवती काही वाद निर्माण झाले आहेत. रणवीर सिंग आणि दिग्गजांची मांदियाळी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो, हे ५ डिसेंबरनंतर स्पष्ट होईल.
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा ...
'धुरंधर'च्या ॲडव्हान्स बुकिंगमधून ३.६७ कोटींची कमाई
रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) आगामी 'धुरंधर' (Dhurandhar) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापूर्वीच जोरदार कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून त्याला प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्क (Sacnilk) च्या अहवालानुसार, 'धुरंधर'नं ब्लॉक सीट्ससह ॲडव्हान्स बुकिंगमधून आधीच ३.६७ कोटींची कमाई केली आहे. ही कमाई चित्रपटासाठी अत्यंत सकारात्मक संकेत आहे. रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत या चित्रपटाची ४४,९८७ हून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत आणि या दोन दिवसांत 'धुरंधर'ला ॲडव्हान्स बुकिंगमधून आणखी मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे. प्रेक्षकांमध्ये असलेली ही प्रचंड उत्सुकता पाहता, 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'धुरंधर' चित्रपट अनेक मोठे विक्रम मोडण्याच्या तयारीत
रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) 'धुरंधर' (Dhurandhar) या आगामी चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. 'धुरंधर'ची ॲडव्हान्स बुकिंगची गती पाहता, रणवीर सिंहचाच यापूर्वीचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' याने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बनवलेला विक्रम हा चित्रपट मोडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नव्हे, तर 'धुरंधर' हा सिनेमा सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून कमावलेला १०.०९ कोटींचा विक्रमही मोडू शकतो, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचा ॲडव्हान्स बुकिंगचा विक्रम आधीच मोडला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून काही दिवस बाकी असताना, 'धुरंधर' ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोणत्या मोठ्या कलाकारांचे विक्रम मोडतो, याकडे आता संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागून राहिले आहे.