नाशिक जिल्ह्यातील ११ नगर परिषदांसाठी आज होणार मतदान

नगरसेवक पदासाठी १०२८, तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार आखाड्यात


नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीसाठी आज मंगळवार (दि. २ डिसेंबर) रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून अधिकारी व कर्मचारी सोमवारी सायंकाळीच संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले. नगरसेवक पदासाठी १०२८ तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत.


उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त होणार असून बुधवारी (दि. ३) होणाऱ्या मतमोजणीची तयारीही पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.जिल्ह्यातील ३ लाख ७२ हजार ५४३ मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, भगूर, ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, सटाणा, मनमाड, नांदगाव आणि येवला या ११ नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला प्रचार थंडावला असून प्रचाराचा धुरळाही खाली बसला आहे. नगरसेवक पदासाठी १०२८ तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार मैदानात आहेत.


सिन्नर, ओझर आणि चांदवड मतदारसंघातील एकूण सात प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने रविवारी स्थगित केली असून या प्रभागांत आता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, उर्वरित ११ नगरपरिषदांमधील ४१६ मतदान केंद्रांवर आज मतदान घेण्यात येणार असून ईव्हीएम मशीनची केंद्रांवर पोहोच झाली आहे. मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी व कर्मचारी सोमवारी १५० वाहनांद्वारे कर्तव्यस्थळी दाखल झाले.


मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाचे सहआयुक्त शाम गोसावी यांनी केले आहे. जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी मतदान व मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


..................


नाशिक जिल्ह्यात १,८७,९०६ पुरुष मतदार, १,८४,६१९ महिला मतदार, जिल्ह्यात १८ तृतीयपंथीय मतदार, मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल वापरण्यास बंदी, २५०० कर्मचारी.. १५० वाहन व्यवस्था, १ मतदान केंद्रवार ५ अधिकारी (कर्मचारी)

Comments
Add Comment

कुंभमेळा आरक्षित क्षेत्राचे संपादन न करता कारवाई रद्द करावी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन

दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात

पदभरती करा अन्यथा पशुवैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द

६० टक्के रिक्त पदांमुळे कारवाईची टांगती तलवार मुंबई : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत