मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न झाले. सूरज चव्हाणच्या लग्नाचे आणि लग्नाआधीच्या सर्व शुभविधींचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यावरून सूरज चव्हाणच्या लग्नाला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने हजेरी लावल्याचे दिसते. त्यापैकी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक आणि इन्फ्लुएन्सर जान्हवी किल्लेकरचे सूरजच्या हळदी समारंभाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र लग्नातील धमाल वातावरणानंतर जान्हवीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.
जान्हवीने सूरजच्या लग्नात मेंदी, हळद, साखरपुडा, लग्नाची वरात या सर्वच विधींमध्ये केलेली धमाल सोशल मीडीयावर पाहायला मिळाली. तसेच जान्हवीने सूरजच्या पत्नीसोबतही डान्स केला. जान्हवीने मनमोकळेपणाने केलेल्या सर्व मज्जा मस्तीला नजर लागल्यामुळे तिची तब्येत बिघडली असल्याचे जान्हवीने सोशल मीडीया पोस्टमध्ये लिहले आहे. तिला सध्या 'कोकिलाबेन धीरूभाई अंबानी' या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल चाहते जान्हवी किल्लेकरचे कौतुक करत आहेत.
जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती रुग्णालयातील बेडवर दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने, 'नजर इज रिअल' असे कॅप्शन लिहिले आहे. जान्हवीच्या या पोस्टवर चाहत्यांनी काळजी व्यक्त करत कमेंट्स केल्या आहेत. 'काळजी घे', 'छान दिसत होती म्हणून नजर लागली आहे', अशा काळजीच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी 'लग्नात भरपूर नाचलेल्याचा परिणाम', 'सुरजच्या लग्नात उड्या मारून पडली आजारी', 'हळद आणि लग्न जरा जास्तच झालं वाटतं', 'लग्न महागात पडलं वाटतं' अशाही कमेंट्स केल्या आहेत.
मुंबई: बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिचे नाव एका लोकप्रिय क्रिकेटपटूसोबत ...