मोहित सोमण: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचा मूड संमिश्र व संभ्रमात झाल्याचे अधोरेखित झाले आहे. मोठ्या घसरणीचा फटका म्हणून गुंतवणूकदारांनी एकाच सत्रात २ लाख कोटी पाण्यात घालवले आहेत. दुसऱ्या तिमाहीत वाढलेल्या जबरदस्त ८.२% जीडीपी वाढीनंतर रेपो दरातही कपात अपेक्षित असताना अद्याप यावर चित्र स्पष्ट झाले नाही हीच परिस्थिती युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची असून युएस व भारत यांच्यातील कराराची अनिश्चितता, बँक निर्देशांकातील वेटेजमध्ये आगामी बदल या कारणामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. एकीकडे घरगुती गुंतवणूकदारासह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अस्थिरता व घसरलेला रूपया या कारणामुळे गुंतवणूक काढून घेतली असून दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाल्याचेही वर्तवले जात आहे. घसरणीचाच परिपाक म्हणून आज सेन्सेक्स ५०३.६३ अंकाने घसरत ८५१३८.२७ व निफ्टी १४३.५५ अंकाने घसरत २६०३२.५० पातळीवर स्थिरावला आहे. दोन्ही बँक निर्देशांकात ४०० अंकाहून अधिक घसरण बाजारात झाली आहे ज्याचा फटका सपोर्ट लेवल मिळण्यास बसला. याखेरीज मिडकॅप शेअर्समध्ये सकाळची तेजी वगळता अखेरच्या सत्रात मिडकॅप लार्जकॅपसह स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण आज नोंदवली गेली. विशेषतः सर्वाधिक घसरण फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.७८%), निफ्टी केमिकल्स (०.७५%), मिडिया (०.४०%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.४४%) निर्देशांकात झाले असून वाढ फार्मा (०.०८%),मिड स्मॉल हेल्थकेअर (०.२८%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.२८%) निर्देशांकात झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात एकूणच तेजीची भावना होती. फेडरल व्याजदरात कपातीची अपेक्षा जोरदार बाळगल्याने आशियाई बाजारातील बहुतांश मात्र वाढ झाली आहे. आज गिफ्ट निफ्टी (०.५५%) वगळता सर्वाधिक घसरण शांघाई कंपोझिट (०.४२%) निर्देशांकात झाली असून वाढ कोसपी (१.८७%), तैवान वेटेड (०.८०%), जकार्ता कंपोझिट (०.७९%) बाजारात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.१५%) निर्देशांकात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (०.५३%), नासडाक (०.४६%) बाजारात घसरण झाली आहे. अखेरच्या सत्रात अस्थिरता राहण्यासाठी आणखी एक कारण म्हणजे उद्यापासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरु होणार आहे ज्याचा निकाल ५ डिसेंबरला लागणार आहे. हेवीवेट शेअर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अदानी एंटरप्राईजेस, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या शेअर्समध्ये आज घसरण झाली असून ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपपैकी मारूती सुझुकी, बजाज फायनान्स, टाटा इलेक्सी शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ बालकृष्ण इंडस्ट्रीज (६.३३%),अकझो नोबेल (५.५६%), बिर्लासॉफ्ट (५.०६%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (४.४९%), मिंडा कॉर्पोरेशन (४.२९%), एशियन पेंटस (३.०३%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण बजाज हाउसिंग (७.१५%), गार्डन रीच (४.६३%), वेलस्पून लिविंग (३.९६%), सिटी युनियन बँक (३.५२%), एथर एनर्जी (३.३८%), इंडियन बँक (३.१४%),अनंत राज (२.९७%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.७४%), दीपक फर्टिलायजर (२.७१%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' रुपया कमकुवत होत चालल्याच्या चिंतेमुळे आणि सततच्या एफआयआयच्या बहिर्गमनामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये नफा बुकिंग सुरूच राहिली. दरम्यान, सेबीच्या नियमांनुसार एनएसईच्या क्षेत्रीय निर्देशांकात सुधारणा झाल्यामुळे प्रमुख बँकिंग काउंटरमध्ये सुधारणा झाल्या. जवळच्या काळात, मजबूत जीडीपी डेटा आणि अमेरिका-भारत व्यापार चर्चेभोवती अनिश्चितता यामुळे आरबीआयकडून दर कपातीची अपेक्षा कमी होत असल्याने गुंतवणूकदारांना आशा निर्माण होऊ शकते. तरीही, मजबूत देशांतर्गत मॅक्रो फंडामेंटल्स आणि आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मजबूत कमाईचा अंदाज पुढे जाण्यास आधार देण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,' भारतीय बाजार आज नकारात्मक स्थितीत उघडले, बेंचमार्क निफ्टी निर्देशांक २६०८७ पातळीवर गॅप-डाउनने सुरुवात करत होता. सुरुवातीच्या सत्रात निर्देशांकाने २६१५४ पातळीच्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श करून पुनर्प्राप्तीचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर लवकरच हा वेग कमी झाला. निफ्टी नंतर २६००० पातळीच्या महत्त्वाच्या तांत्रिक आणि मानसिक पातळीची चाचणी घेण्यासाठी घसरला. क्षेत्रनिहाय, वाढ केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपुरती मर्यादित होती, तर बहुतेक इतर क्षेत्रे लाल रंगात व्यवहार करत होती. मीडिया, वित्तीय सेवा, खाजगी बँका, तेल आणि वायू आणि ग्राहक टिकाऊ वस्तूंमध्ये लक्षणीय कमकुवतपणा दिसून आला.
डेरिव्हेटिव्ह्ज आघाडीवर, पॉवरइंडिया, नौक्री, युनियन बँक, बीडीएल आणि सीएएमएसमध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. ९ डिसेंबर २०२५ रोजी साप्ताहिक समाप्तीसाठी निफ्टी ऑप्शन्स विभागात, सर्वोच्च कॉल ओपन इंटरेस्ट २६२०० आहे, तर पुट बाजूला, महत्त्वपूर्ण ओपन इंटरेस्ट २६००० आणि २५५०० पातळीवर दिसून येत आहे.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,' बँक निफ्टीने मंगळवारी सत्र बंद केले आणि त्याच्या १०-दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) जवळ मंदीचा कॅंडलस्टिक पँटर्न निर्माण केला जो उच्च पातळीवर विक्रीचा दबाव दर्शवितो. नकारात्मक आयएसआय (Relative Strength Index RSI) विचलन, RSI मंदीच्या क्रॉसओवरमध्ये घसरण्यासोबत निर्देशांकातील अल्पकालीन कमकुवतपणाला बळकटी देते. सध्याच्या सेटअपला पाहता, निर्देशांक ५८८०० पातळीच्या आसपास त्याच्या २०-दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) ची चाचणी घेण्यासाठी खाली जाऊ शकतो. तात्काळ आधार (Immdiate Support) ५९००० पातळीवर आहे, तर स्थितीत्मक आधार ५८८०० पातळीवर आहे, जो त्याच्या २०-दिवसांच्या SMA शी संरेखित आहे आणि उच्च टोकावर, प्रतिकार ६०००० पातळीजवळ स्थिर राहतो.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'निफ्टीने आणखी एक दिवस मंद व्यापार पाहिला, ज्यामध्ये प्रामुख्याने नकारात्मक पूर्वाग्रह होता. तासिक चार्टवर, निर्देशांक २१ दिवस ईएमए (EMA) च्या खाली व्यवहार करत राहिला. दैनिक चार्टवर सौम्य नकारात्मक विचलनामुळे अलिकडच्या गतीतील कमकुवतपणाला हातभार लागला आहे. तासिक चार्टवर (Hourly Chart) वाढणारी ट्रेंडलाइन तात्काळ आधार देते; तथापि, जर निफ्टी या ट्रेंडलाइनच्या खाली घसरला तर २५९०० पातळीच्या दिशेने घसरण होऊ शकते. दुसरीकडे, प्रतिकार (Resistance) २६१५० पातळीवर ठेवला आहे आणि या पातळीच्या वर गेल्यास भावना सुधारू शकते. एकूणच, पुढील काही दिवस मंदी ते बाजूच्या भावना कायम राहू शकतात.'