मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक प्रतिमा मोडून सेवा, कर्तव्य आणि जबाबदारी यांना प्राधान्य देणारे नवे मॉडेल आकार घेत आहे. या बदलाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे देशातील प्रमुख सरकारी संस्थांना नवीन, अर्थपूर्ण आणि जनसामान्यांशी जोडणारी नावे देणे. याअंतर्गत पंतप्रधान कार्यालयाला आता ‘सेवा तीर्थ’ असे नवे नाव दिले जात असून, राजभवनांना ‘लोक भवन’ म्हणून पुन्हा ओळख मिळणार आहे. शासनव्यवस्थेत लोकसेवा आणि पारदर्शकतेची नवी भावना निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत प्रशासकीय संकल्पना बदलण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रक्रियेला बळ देत सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमधील नव्या पीएम ऑफिस कॉम्प्लेक्सला सेवा तीर्थ असे नाव देण्यात येत आहे. यामागील मुख्य हेतू सत्ता नव्हे, तर लोकसेवा हीच शासनाची खरी ओळख आहे, हा संदेश दृढ करणे हा आहे.


फक्त प्रशासनिक नव्हे, तर सांस्कृतिक बदल


या उपक्रमांना फक्त नावबदल म्हणून न पाहता, हा शासनातील सांस्कृतिक आणि नैतिक परिवर्तनाचा भाग असल्याचे सरकारचे मत आहे. प्रत्येक इमारत, प्रत्येक प्रतीक आणि प्रत्येक नवे नाव ही एकच कल्पना पुढे नेत आहेत – सरकार हे जनतेची सेवा करण्यासाठीच आहे. याच धर्तीवर राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ करण्यात आले होते.


लोक कल्याण मार्ग, कर्तव्य भवन आणि आता सेवा तीर्थ… ही नावे ‘वेल्फेअर’ आणि ‘ड्यूटी’ या संकल्पनांना अधिक महत्त्व देतात. पीएमच्या अधिकृत निवासस्थानाचा पत्ता २०१६ मध्ये रेसकोर्स रोड ऐवजी लोक कल्याण मार्ग असा करण्यात आला, ज्यातून शासनाच्या लोकाभिमुख दृष्टीकोनाची झलक दिसते.


नव्या नावांचे प्रतीकात्मक महत्त्व


कर्तव्य भवन म्हणून ओळखला जाणारा सेंट्रल सेक्रेटेरिएट हा या तत्त्वज्ञानावर आधारित एक प्रमुख हब बनत आहे. सार्वजनिक सेवा ही एक जबाबदारी आहे, ही भावना या संकल्पनेतून पुढे येते. प्रशासनिक पुनर्रचनेतील हे बदल भारताच्या लोकशाहीला नवी दिशा देत असून, स्टेटसऐवजी सेवा आणि पॉवरऐवजी जबाबदारी यांचा विचार अधोरेखित करत आहेत.

Comments
Add Comment

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली.

दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात