अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर पाकिस्तान सरकार नरमले. यानंतर बहिणीला डॉ. उज्मा खानुमना माजी पंतप्रधान इमरान खान यांना तुरुंगात जऊन भेटण्यासाठी परवानगी दिली. पाकिस्तान सरकार नरमले आणि डॉ. उज्मा खानुम यांनी माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात भेट घेतली. तुरुंगात तब्बल वीस मिनिटे माजी पंतप्रधान इमरान खान यांना त्यांची बहीण डॉ. उज्मा खानुम भेटल्या. या भेटीत इमरान खान यांनी डॉ. उज्मा खानुम यांना धक्कादायक माहिती दिली.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे शाहबाज शरिफ यांच्या सरकारवर विविध पद्धतीने दबाव आणत आहेत. या दबावांमुळेच शाहबाज शरिफ सरकारने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या हाती देशाची सूत्रे सोपवण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. एकदा पाकिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळवले की असीम मुनीर हे कधी कसे वागतील याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे अनेक पाकिस्तानचे अभ्यासक सांगत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या जवळच्या नातलगांपैकी कोणाचीही भेट झाली नव्हती. यामुळे इमरान जिवंत आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पाकिस्तानमधील इमरान समर्थकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे बघून पाकिस्तान सरकारने इमरान आणि त्यांच्या बहिणीची भेटण्याची वेळ निश्चित केली. यानंतर इमरान यांना त्यांची बहीण भेटली. या भेटीत इमरान यांनी बहिणीला धक्कादायक माहिती दिली आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख देश नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. इमरान खान यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून इमरान यांना दिवसभर तुरुंगात डांबले जाते. इमरान यांना कोणीही भेटणार नाही तसेच त्यांच्याशी कोणीही बोलणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. असीम मुनीर यांच्यापासूनच पाकिस्तानला सर्वाधिक धोका आहे; असे इमरान यांना भेटल्यानंतर त्यांच्या बहिणीने म्हणजेच डॉ. उज्मा खानुम यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
Comments
Add Comment

Iran - America War : इराणविरोधात ट्रम्प यांचा मोठा डाव? अमेरिकन लष्कराला नव्या कारवाईचे आदेश; मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढला

वॉशिंग्टन : अमेरिका (America)आणि इराण (Iran) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड

Pakistan Coal Mine Blast : बलुचिस्तान हादरलं! कोळसा खाणीतील स्फोटात ३२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

क्वेटा : पाकिस्तानातील बलुचिस्तान (Balochistan) प्रांताची राजधानी क्वेटा (Quetta) शहराजवळील एका कोळसा (Coal) खाणीत भीषण स्फोट (Blast)

Hamas : ट्रम्प यांची मोठी घोषणा! हमासच्या पूर्ण निःशस्त्रीकरणानंतर गाझातून इस्रायली सैन्य माघारी

गाझा (Gaza) संघर्ष संपवण्याच्या दिशेने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हमास (Hamas) आणि इस्रायल (Israel) यांच्यात व्यापक

Spain Migration : स्पेनच्या स्यूटा सीमेजवळ हजारोंची घुसखोरी; समुद्रातून प्रवेशाच्या प्रयत्नांत १८ जणांचा मृत्यू

स्पेन : स्पेन (Spain) आणि मोरोक्को (Morocco) यांच्या सीमेलगत असलेल्या स्यूटा (Ceuta) या स्पेनच्या स्वायत्त शहरात मोठे स्थलांतर

Iran - America War : जॉर्डनमधील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर हल्ले

वॉशिंग्टन : जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केली

World Record Flight : हवेत सलग २४ तासांपेक्षा जास्त वेळ! क्वांटास एअरलाइन्सच्या विमानाने रचला ऐतिहासिक जागतिक विक्रम

तुलूझ : ऑस्ट्रेलियन विमान कंपनी ‘क्वांटास’ने (Qantas) नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. एका विशेष