मोहित सोमण: हिरो मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) कंंपनीने आज आपली नोव्हेंबर महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २५% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील ४२०६७७ युनिटची विक्री झाली होती ती इयर ऑन इयर बेसिसवर २८% वाढत ५९११३६ युनिटवर नोंदवली गेली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, दुचाकी निर्यातीत ५७४९१ युनिट्सची वाढ नोंदवली गेली आहे. इयर टू डेट (Year to Date YTD) पाहता कंपनीच्या एकूण युनिट्स विक्रीत ४२३७७४८ पर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. त्यापैकी ३८१२०९६ युनिट्सची घरगुती बाजारात विक्री झाली असून उर्वरित ४२०६५२ युनिट्सची विक्री परदेशात निर्यातून झाली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी एकूण युनिट्स विक्रीत कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) घरगुती बाजारपेठेत २.९०%,निर्यातीतून ४७% व एकूणच ५.५६% वाढ नोंदवली होती. कंपनीने म्हटल्याप्रमाणे, कंपनीने मोठ्या प्रमाणात सीएसआर (Corporate Social Responsibility CSR) या उपक्रमात पण आपली उपस्थिती नोंदवली असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. कंपनीने कोइंबतूर येथे कन्व्हेशन सेंटर उघडले असून त्यातून रोड सेफ्टी प्रकल्पात कंपनी कार्यरत असल्याचे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. सीएसआर (CSR) योजनेचा भाग म्हणून दिव्यांगासाठी कुशल विकास केंद्र घोषित केले.