हरमनप्रीत कौर पंजाब नॅशनल बँकेची पहिली महिला ब्रँड ॲम्बेसडर होणार

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या पीएसयु बँकेपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (PNB) ने आज बँकेची पहिली महिला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि विश्वचषक विजेत्या हरमनप्रीत कौर यांना घोषित केले आहे. ही भागीदारी पीएनबीच्या ब्रँड परिवर्तन प्रवासातील एक रणनीतिक टप्पा म्हणून ओळखली जाणार आहे. बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयात ‘बँकिंग ऑन चॅम्पियन्स’ या व्यापक थीमअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.ब्रँड ॲम्बेसडर म्हणून आपल्या पहिल्या अधिकृत कार्याचा निभाव करताना, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि विश्वविजेती हरमनप्रीत कौर यांनी सचिव (FS) एम. नागराजू आणि पीएनबीचे एमडी व सीईओ अशोक चंद्र यांच्यासह बँकेची चार वित्तीय उत्पादने (Financial Products) लाँच केली आहेत. पीएनबी रुपे मेटल क्रेडिट कार्ड ‘लक्सरा’, पीएनबी वन २.० ‘डिजी सूर्य घर’ आणि आयआयबीएक्स पोर्टलवरील पीएनबीचे ऑनबोर्डिंग ही सगळी उत्पादन या कार्यक्रमात घोषित केली गेली आहेत.


या प्रसंगी बोलताना सचिव (एफएस) एम. नागराजू म्हणाले आहेत की,'हरमनप्रीत कौर यांनी पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघाला विजय मिळवून देत भारताचा गौरव वाढविला आहे आणि लाखो तरुण महत्त्वाकांक्षी लोकांना प्रेरित केले आहे. पीएनबीबद्दल बोलायचे झाले तर, ते विलक्षण काम करत आहेत, विशेषतः एमएसएमई अभियान आणि या मेटल क्रेडिट कार्डच्या लाँचमुळे विशिष्ट ग्राहक समूहासाठी एक महत्त्वपूर्ण उत्पादन जोडले गेले आहे.' तसेच त्यांनी सोन्याच्या बुलियनच्या ऑनलाइन ट्रेडिंगसाठी पीएनबीला आयआयबीएक्सवर ऑनबोर्ड करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


या घडामोडींवर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि विश्वविजेती हरमनप्रीत कौर म्हणाल्या आहेत की,' हे खरंच अविश्वसनीय वाटत आहे. मी जेव्हा १८ वर्षांची होते, तेव्हापासून मी पीएनबीसोबत बँकिंग करत आहे, आणि माझे पहिले खाते पीएनबीच्या मोगा शाखेत होते. आज या बँकेची ब्रँड ॲम्बेसडर म्हणून येथे उभे राहणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. पीएनबीने पिढ्यान् पिढ्या भारतीयांच्या आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यास मदत केली आहे, आणि लोकांना विशेषतः महिलांना आणि तरुण प्रतिभांना सशक्त करण्याची त्याची बांधिलकी माझ्या मनाला स्पर्श करते. संपूर्ण भारतातील आणखी अनेक चॅम्पियन्सना प्रेरित करण्यासाठी एकत्र काम करण्याची मला आशा आहे. पीएनबी मेटल क्रेडिट कार्ड ‘लक्सरा’ची पहिली ग्राहक बनण्याचा मला आनंदही होत आहे.'


पीएनबीचे एमडी आणि सीईओ अशोक चंद्र म्हणाले आहेत की,'भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार आणि विश्वविजेत्या हरमनप्रीत कौर यांचे पीएनबी परिवारात स्वागत करताना आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. पीएनबीच्या इतिहासात प्रथमच आमच्याकडे एक महिला ब्रँड ॲम्बेसडर आहे. त्यांचे नेतृत्व, जिद्द आणि उत्कृष्टतेच्या शोधाची वृत्ती आमच्या बँकेच्या मूल्यांना प्रतिबिंबित करते. आम्हाला ‘लक्सरा’आमच्या विशिष्ट ग्राहकांसाठी तयार केलेले पहिले मेटल क्रेडिट कार्डसादर करताना देखील आनंद होत आहे. हे कार्ड अद्वितीय अनुभव प्रदान करण्यासाठी आणि विद्यमान बाजारात एक नवा मापदंड स्थापित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.'


बँकेच्या माहितीनुसार, पीएनबीचे रुपे मेटल क्रेडिट कार्ड लक्सरा हे एक प्रीमियम क्रेडिट कार्ड बँक ऑफर करत आहे जे विशेष विशेषाधिकार आणि अधिक मूल्य शोधणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन केलेले आहे असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. कार्डमध्ये व्यापक रिवॉर्ड प्रोग्रॅम आहे, ज्यामध्ये ९० दिवसांच्या आत ५०००० खर्च केल्यास ४०००० वेलकम रिवॉर्ड पॉइंट्स (१०००० मूल्यांचे) आणि ५ लाख वार्षिक खर्चावर एकूण १०००० माइलस्टोन रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात असे बँकेने स्पष्ट केले. हे कार्ड हॉटेल संबंधी बँक ऑफर धारकांना विशेषाधिकार देईल अशी माहिती पुढे आली आहे. उदाहरणार्थ ITC हॉटेल्समध्ये 2+1 पूरक (कॉम्प्लिमेंटरी) नाइट आणि निवडक ITC रेस्टॉरंट्समध्ये 1+1 सेट मेनू सारखे डाइनिंग फायदे या बँक ऑफर मध्ये समाविष्ट असतील. लक्स एलिट प्लस सदस्यत्व असलेल्या कार्डधारकांना हयात, मॅरियट, फोर सीझन्स, हिल्टन, अकोर आणि इतर अनेक सदस्य हॉटेल शृंखलांसह (Hotel Chain) सह इतर विविध फायदे मिळू शकतात.


पीएनबीने पीएनबी वन 2.0 (त्याच्या मुख्य मोबाइल ॲपचे नवीन आवृत्ती) आणि डिजी सूर्य घर (रुफटॉप सौर ऊर्जा प्रणालींसाठी पूर्णपणे डिजिटल वित्तपुरवठा उपक्रम) देखील लाँच करत पीएनबीला आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज (IIBX) वर देखील ऑनबोर्ड नुकतेच केले गेले. सोहळ्यात आकर्षक रॅपिड-फायर संवाद, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश होता. सोहळ्याच्या भाग म्हणून, पीएनबीने 10 तरुण महिला क्रिकेटपटक्यांना आमंत्रित केले, ज्यांना हरमनप्रीतच्या स्वाक्षरीसह पीएनबी-ब्रँडेड क्रिकेट किट दिल्या गेल्या, ज्यामुळे तरुण क्रीडापटूंना आत्मविश्वासाने त्यांच्या खेळाच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

३०००० कोटी मालमत्तेतील वाद शिगेला? करिष्मा कपूरला दोन आठवड्यात खुलासा करण्याचे न्यायालयाकडून आदेश

नवी दिल्ली: करिष्मा कपूर व प्रिया कपूर यांच्यातील मालमत्तेतील वाद आता नव्या उंचीवर पोहोचवण्याची शक्यता वर्तवली

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार चालू राहणार का? ही आहे माहिती

मोहित सोमण: एनएसई (National Stock Exchange NSE) प्रसिद्ध केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, रविवार १६ जानेवारी २०२६ या वार्षिक

शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी- सेबीकडून निर्णय इक्विटी कॅश सेगमेंट सत्रात CAC लागू होणार!

मोहित सोमण: सेबी (Security Exchange Board of India SEBI) या बाजार नियामक मंडळाने आलेल्या कन्सल्टेशन पेपरचा विचार करून शेअर बाजारात एक

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट