वॉकहार्ट शेअर दे दणादण! कंपनीचा शेअर १९% उसळला असून २०% इंट्राडे उच्चांकावर ! 'या' मोठ्या घडामोडीमुळे

मोहित सोमण: ड्रग्स बनवणारी कंपनी वॉकहार्ट कंपनीला जगातील मानक व प्रभावशाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस एफडीएफ (अन्न आणि औषध प्रशासन FDA) या नियामक मंडळांकडून नवीन ड्रग्स बनवण्यासाठी परवानगी दिल्याने कंपनीचा शेअर १९% उसळला आहे. नियामकांनी कंपनीचा एनडीए म्हणजेच (New Drug Application) स्विकारल्याने शेअर्समध्ये जबरदस्त उसळी घेतली गेली आहे. झायनिच या प्रतिजैविके (Antibiotics) औषध उत्पादनावर कंपनी काम करत होती. याला अखेर मोहोर लागल्याने कंपनीच्या उत्पादनावर शिक्कामोर्तब झाल्याने कंपनीला जबरदस्त प्रतिसाद गुंतवणूकदारांनी दिला आहे. दुपारी १.५४ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १८.१८% म्हणजेच १९% उसळल्याने १४५९.५० प्रति शेअर पातळीवर उसळला आहे.


कंपनीने या नव्या उत्पादनाविषयक युएस अन्न नियामक मंडळाला ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज केला होता. यावेळी कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एनडीए ३० सप्टेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता आणि त्याची स्वीकृती ही केवळ वोक्हार्टसाठीच नाही तर संपूर्ण भारतीय औषध उद्योगासाठी एक परिवर्तनकारी क्षण आहे, असे मुंबईस्थित कंपनीने एका निवेदनात म्हटले.


'इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय औषध कंपनीकडून नवीन रासायनिक अस्तित्वासाठी (एनसीई) एनडीए दाखल करण्यात आला आहे आणि यूएस एफडीएने तो स्वीकारला आहे' असेही त्यात म्हटले आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये रॅली झाल्याने ओपनिंग बेलला असलेल्या पातळीपेक्षा शेअर जवळपास २०% उसळला आहे. उपलब्ध माहितीनुसार, या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढलेल्या व्यवहारांमुळे परावर्तित झालेल्या मालकीत २०% वाढ झाली आहे. ही संख्या ७.७६ दशलक्ष रूपयांची सांगितली जात आहे.


गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १४% रॅली झाली असून संपूर्ण महिनाभरात ३.०८% वाढ व वर्षभरात २.०६% वाढ शेअर्समध्ये झाली आहे. यापूर्वी कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ५२ आठवड्यातील सर्वाधिक उच्चांकी पातळी (All time High) ११०५.०५ रूपये प्रति शेअरवर नोंदवली होती.


गेल्या तीन वर्षांत शेअर्समध्ये दीर्घकालीन वाढ ५०० % पेक्षा जास्त झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ऑपरेटिंग नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. जुलै २०२५ मध्ये कंपनीने नवीन अँटीबायोटिक शोध आणि त्याच्या जैविक पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यूएस जेनेरिक फार्मा सेगमेंटमधून बाहेर पडण्याची घोषणा केली.

Comments
Add Comment

सिगारेट, बिडी, तंबाखू ग्राहकांसाठी महत्वाची बातमी: शौक 'महंगी' चीज है! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनसीएस विधेयक लोकसभेत मांडले !

नवी दिल्ली: जीएसटी सेसमध्ये फेरबदल करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभा हिवाळी

कणकवलीत उद्या नगरपंचायतीसाठी मतदान

ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवाना कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान

मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने

भूराजकीय स्थितीचा रूपयावर जबरदस्त फटका रूपया ८९.७६ या ऐतिहासिक पातळीवर घसरला

मोहित सोमण: प्रादेशिक पेक्षाही जागतिक भूराजकीय परिस्थितीत बदलत्या अस्थिर समीकरणामुळे आज रुपयात ऐतिहासिक घसरण

निर्देशांकाला धोका? परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची शेअर बाजारात विक्री वाढली

प्रतिनिधी: चांगल्या गुंतवणूक वाढीमुळे शेअर बाजारात ऑक्टोबर महिन्यात समाधानकारक वाढ नोंदवली गेली होती.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या एसयुव्ही कार विक्रीत लक्षणीय २२% वाढ

मोहित सोमण: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या विक्रीत वाढ अपेक्षित होती. त्यात धर्तीवर कंपनीने आज आकडेवारी जाहीर