मोहित सोमण: मजबूत फंडामेंटलच्या आधारे व मोठ्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढलेल्या दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीतील आकडेवारीमुळे शेअर बाजार आज नव्या रेकॉर्डवर पोहोचला मात्र काही प्रश्नचिन्ह कायम आहेत. आज सेन्सेक्सने ८५१५९.०२ व निफ्टी २६३२५.८ व बँक निफ्टीने ६०००० पातळी सुरुवातीच्या कलात गाठली होती. मात्र अखेरच्या सत्रात हीच वाढ कायम राहू शकते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.
बाजारात अस्थिरता राहण्याची ही कारणे -
१) वाढत असलेली अस्थिरता - सर्वप्रथम भूराजकीय स्थिती पाहता शांतता अथवा सकारात्मकता कायम असली तरी युएस यांच्यातील राजकीय गादीच्या लढाईचा परिणाम आणखी चिघळल्यास त्याचा आणखी फटका अखेरच्या सत्रात किंवा येणाऱ्या सत्रात बसू शकतो.
२) डिजिटल असेटमधील वाढलेले नफा बुकिंग - मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर पाहता ईटीएफ, डिजिटल करन्सी, व्हर्च्युअल करन्सी, स्पॉट दरात आज मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या महिन्याभरातील ही तिसऱ्यांदा घसरण बीटकॉईन व इतर क्रिप्टोग्राफीत झाली आहे. युएस बाजारात खरं तर व्याजदरात कपतीची अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढली होती. बाजार तज्ञांच्या मते ही २५ बेसिस पूर्णांकाने अपेक्षित होती. मात्र फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा करु नका असे धक्कादायक विधान जेरोम पॉवेल यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे बाजारातील अस्थिरता वाढण्याचा धोका आहे. गेल्या २४ तासात बीटकॉईन ३.८%, इथेरियम ४.४%, सोलाना ६.३% घसरले आहे. युएस व्याजदरातील कपातीच्या आशावादावर संभ्रम पसरल्याने क्रिप्टोग्राफीत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळच्या सत्रात डॉलर निर्देशांकात (Dollar Index DXY) यामध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली. तज्ञांच्या मते, या किंमतीत मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग (Profit Booking ) झाल्याने या किंमती घसरल्या अथवा प्राईज करेक्शन झाले असे आपण म्हणू शकतो.
३) आशियाई बाजारातील वाढती अस्थिरता - चीनच्या उत्पादकतेत वाढ झाली असली तरी नव्या आकडेवारीनुसार चीनच्या पीएमआय (Product Manufacturing Sector) निर्देशांकात घसरण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा ५० पेक्षाही खाली जात ४९.९ पातळीवर घसरला आहे. अर्थात काल चीनच्या जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चीनच्या कारखान्यांच्या कामकाजातील निर्देशांकात नोव्हेंबरमध्ये किंचित सुधारणा होऊन ४९.२ पर्यंत वाढ झाली असली तरी पसलग आठव्या महिन्यात ती आकुंचन पावली आहे. मागील सुट्ट्यांमधील वाढ कमी झाल्यामुळे सेवा कमकुवत झाल्या असे अहवालात म्हटले गेले होते. याशिवाय पीपल्स बँक ऑफ चायनाने डिजिटल चलनांशी संबंधित बेकायदेशीर कारवाया आणि सट्टेबाजीच्या पुनरुज्जीवनाचा इशारा दिल्यानंतर डिजिटल मालमत्तेचा वापर करणाऱ्या हाँगकाँगमधील बाजारात घसरण झाली होती. तर युएसमधील १० डिसेंबर रोजी होणाऱ्या फेड बैठकीत दर कपात होण्याची शक्यता ८७.४% असल्याचे आता व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे आशियाई किंवा युएस बाजारातील अस्थिरता या आठवड्यात वाढू शकते. मात्र जमेची बाजू म्हणजे युएसमधील रिटेल सेल्स आकडेवारी काल जाहीर झाली ज्यामध्ये ४.१% इतकी चांगली वाढ झाली आहे. तसेच युएसमधील इ कॉमर्स विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर ९.१% वाढ झाली ज्यामुळे तेजीचा व घसरणीचा अंदाज तूर्तास येणे अपेक्षित नाही.
४) भारतातील आकडेवारी- भारतीय बाजारात जीडीपीतील ८.२% इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची वाढ अपेक्षित आहे. मात्र युएस व भारत यांच्यातील करार अपेक्षित असला तरी त्याची पूर्तता अथवा अंमलबजावणी न झाल्याने अद्याप गुंतवणूकदारांच्या मनात द्वंद्व कायम आहे. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात तंबाखू, गुटखा यावरील सेस रद्द झाल्याने जीएसटीत आणखी अतिरिक्त शुल्कवाढ लागू होऊ शकते. तसेच इतर आर्थिक विधायके विधीमंडळात अपेक्षित आहेत. त्यामुळे याचाही परिणाम बाजारात अपेक्षित आहे.
५) घसरलेला रूपया - एकीकडे किरकोळ प्रमाणात डॉलर निर्देशांकात घसरण झाली असली तरी रुपयांच्या तुलनेत डॉलरमध्ये वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते जर भारत युएस व्यापार संबंध थोडेसे सुधारले तरच रुपया बँडच्या मजबूत बाजूकडे जाऊ शकतो. त्यामुळे ८८.८० च्या खाली स्पष्ट ब्रेक हा रुपया अधिक स्थिरपणे मजबूत होऊ शकतो याचे पहिले लक्षण असेल. त्यामुळे अद्याप रूपयांवर दबाव कायम आहे. जर हा करार पूर्णत्वास गेला नाही अथवा अस्थिर राहिला तर त्याचा अधिक परिणाम शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूकीवर व रुपयांवर वाढू शकतो.