नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर


मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या २ तारखेला मतदान होऊन ३ डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपने प्रचारासाठी या निवडणुकीत आपली टीम उतरवली असून त्यांचा अंतर्गत सर्व्हे देखील आता समोर आला आहे. भाजपने केलेल्या या सर्व्हेनुसार पाहिलं तर, निवडणुकीत भाजपचे एकूण १७५ नगराध्यक्ष विजयी होतील. महायुतीत आणि निवडणुकांमध्ये भाजपच मोठा भाऊ असणार असल्याचा या सर्व्हेचा अंदाज आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते मोठ्या उत्साहात असल्याचं चित्र आहे.


लेटसअप या वेब पोर्टलने हे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांना विकासकामं आणि भरपूर निधी देण्याचं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात येतंय. भाजप प्रदेशाध्यक्षासह जवळपास सगळेच मंत्री प्रत्येक नगरपालिका आणि नगरपरिषद पिंजून काढत आहेत. त्यातच आता भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर आला असून या निवडणुकांत भाजपच मोठा भाऊ ठरणार असल्याचा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार राज्यात भाजपचे एकट्याचे १७५ नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज आहे. राज्यात नगराध्यक्ष पदासाठी २४२ ठिकाणी भाजपचे तर ४६ ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. भाजप सर्वाधिक जागा लढवत असल्यानं भाजपचं राज्यात मोठा भाऊ असेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.


दरम्यान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्ही २०० जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात एकूण २८० जागांवर निवडणूक होणार आहे. त्यातील २४२ जागा भाजप कमळ चिन्हावर लढवत असून त्यापैकी २०० जागांवर आम्ही विजयी होऊ, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. निवडणुकांच्या प्रचाराला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळे फिरतोय. त्यामुळे या निवडणुकीत देखील आम्हाला महाराष्ट्र आणि बिहार विधानसभेसारखं यश मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रालयातून समुद्रकिनाऱ्याचा ‘नजारा’ दिसण्यासाठी सरकारच मोठं पाऊल ..

मुंबई : मुख्य मंत्रालय सरकारी कामासाठी अपुरे पडत आहे. याशिवाय जागा कमी असलयाने मंत्रयांची गैरसोयही होत आहे.

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेचा महापौर व्हावा अशी जनतेची इच्छा

एकनाथ शिंदे; शिवसेना जनादेशाच्या विरुद्ध कोणताही निर्णय घेणार नाही मुंबई : “२३ जानेवारीपासून शिवसेनाप्रमुख

मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप-शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक

मुंबई : मुंबईच्या महापौर पदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून चिन्हांच्या गुंत्यावर तोडगा - सोयीनुसार भूमिकेत बदल करणार; अजित पवारांना सोबत घेण्यास आमदार उत्तम जानकरांचा विरोध

मुंबई : महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विशेष रणनीती आखली आहे.

शिवसेनेने अडीच वर्षांकरीता महापौरपद मागितले ही अफवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; स्पष्ट जनादेशानंतर वादविवाद जनतेला आवडणार नाही मुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटींचे सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; १५ लाख रोजगार संधी, आयटी, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक मुंबई : भारतातील