मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. प्रतीक्षा भोसले असे मृत विवाहितेचे नाव असून, तिला पहिली मुलगी आहे. मात्र मुलगा हवा म्हणून तिच्यावर सासरकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.या प्रकरणात पतीसह चार जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदार राजेश्वर वानखेडे यांनी सांगितले की, मुलगी प्रतीक्षाचा विवाह २०२३ मध्ये लक्ष्मण भोसले याच्याशी झाला होता. लग्नावेळी साडेचार लाख रुपये हुंडा दिला होता. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, पण नंतर पती लक्ष्मण भोसले दारूच्या नशेत प्रतिक्षाला मारहाण करू लागला.नणंद माधुरी किशोर देशमुख, दीपाली रामराव देशमुख आणि भाग्यश्री सूरज देशमुख ह्या फोनवरून शिवीगाळ करून प्रतिक्षाल सतावत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.


प्रतिक्षाला पहिली मुलगी झाल्यानंतर छळ आणखी वाढला. मुलगा हवा म्हणून तिच्यावर ओरड, शिवीगाळ आणि पैशांची मागणी केली जात होती. स्कूल व्हॅन घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात आला. प्रतीक्षेच्या कुटुंबाने ५० हजार रुपये दिले, परंतु तरीही त्रास थांबला नाही. दरम्यान, प्रतीक्षा दुसऱ्यांदा गर्भवती राहिली असताना झालेल्या मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. तरीही सासरकडच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही.


सततच्या छळाला कंटाळून प्रतीक्षाने २५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर लहान मुलीच्या डोक्यावर आईचे छत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी पती लक्ष्मण शंकरराव भोसले आणि नणंदा माधुरी, दीपाली व भाग्यश्री देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे

नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे.

मतदानाच्या तोंडावर २० जिल्ह्यांत तारखांमध्ये बदल

नगर परिषदांसाठी २ ऐवजी २० डिसेंबरला मतदान राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बारामती, मंगळवेढ्यासह अनेक नगर

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावपळ, कॉल करणारा जेरबंद

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी

Pune Crime : मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या! पुण्यात दुहेरी हत्याकांड; संगमवाडी परिसरात थरार, तरुणाचे खळबळजनक पाऊल

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हत्या,

IMD Weather Update : हाय अलर्ट जारी! 'डिटवाह' चक्रीवादळामुळे पुढील ४८ तास धोक्याचे; अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

यंदा देशासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

हिंजवडी-वाघोली वाहतूक कोंडीला ब्रेक; PMRDAचा नवा मास्टरप्लॅन जाहीर

पुणे : पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी PMRDA ने मोठी पावले उचलली आहेत. हिंजवडी,