आजपासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडणार तीन महत्त्वाची विधेयकं, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान चालेल ज्यात एकूण १५ बैठका होणार आहेत. या पंधरा दिवसाच्या काळात अणुऊर्जा विधेयकासह दहा नवीन विधेयके सादर होण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एनडीए सरकार लोकसभेत तीन नवीन विधेयके सादर करणार आहे.



अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा अजेंडा


लोकसभा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रथम सभागृहात चर्चा आणि मंजूरीसाठी 'मणिपूर वस्तू आणि सेवा कर (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५' सादर करतील. या विधेयकात विद्यमान मणिपूर वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ मध्ये सुधारणा प्रस्तावित आहेत.


यानंतर अर्थमंत्री केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक, २०२५ आणि आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५ ही दोन विधेयक सादर करतील. आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयकात राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यावरील खर्च भागवण्यासाठी संसाधने वाढवण्याचा आणि या वस्तू ज्याद्वारे उत्पादित केल्या जातात त्या यंत्रसामग्री किंवा इतर प्रक्रियांवर उपकर आकारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अनुदानाच्या पुरवणी मागण्या दर्शवणारे निवेदन सादर करतील.




संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नॅशनल कॉन्फरन्सचे शम्मी ओबेरॉय, सज्जाद अहमद किचलू आणि चौधरी मोहम्मद रमजान या जम्मू आणि काश्मीरमधील तीन नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांना उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन शपथ देतील. २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या राज्यसभेच्या निवडणुकीत, नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने एक जागा जिंकली होती.


राज्यसभेच्या नियमांचे आणि शिष्टाचाराचे उल्लंघन करून परिषदेत फलक लावल्याबद्दल विशेषाधिकार भंग झाल्याच्या कथित प्रकरणावर विशेषाधिकार समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात आपला अहवाल सादर करेल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव मणिपूर राज्यात 'जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) सुधारणा कायदा, २०२४' स्वीकारण्यात यावा यासाठी एक वैधानिक ठराव मांडतील. २०२५-२६ साठी अनुदान पुरवणी मागण्यांचा पहिला भाग देखील हिवाळी अधिवेशनादरम्यान सादर केला जाणार असून त्यावर चर्चा केली जाईल आणि मतदान केले जाईल.

Comments
Add Comment

Parliament Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखू महागणार, अर्थमंत्री सीतारामन आज विधेयक सादर करणार

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार

चार मिनिटांत ५२ वेळा सॉरी म्हणाला, तरी मुख्याध्यापकांचं दुर्लक्ष

आठवीतल्या मुलाकडून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न मध्य प्रदेश  : रतलाम येथील

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या

जगातील सर्वात मोठ्या १० शहरांची यादी समोर, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली  : संयुक्त राष्ट्रांच्या 'वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स २०२५' या ताज्या अहवालानुसार, जगात

देशात ३० वर्षांत कामगार कमी अन् निवृत्तीधारक वाढणार

भारतावर येणार ‘पेन्शन संकट’! नवी दिल्ली  : भारत सध्या तरुण देश मानला जात असला तरी येत्या ३० वर्षांत वृद्धांची

नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी साधला संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या १२८ व्या