मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात जबरदस्त वाढ झाली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर बाजाराने मजबूत फंडामेंटल आधारे मोठा कौल दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी वाढल्याने आज मोठ्या प्रमाणात घरगुती गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून आला. सेन्सेक्स ३९२.०६ अंकाने व निफ्टी खासकरून १०८.९५ अंकाने उसळल्याने बाजारात पहिल्या कौलातच मोठी रॅली झाली आहे. मेटल, आयटी, मिडिया शेअर्समध्ये आलेल्या तेजीने बँक निर्देशांकातील तेजीला अधिक बळ दिले असून एफएमसीजी, हेल्थकेअर, फार्मा शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आशियाई बाजारात कौलही घसरणीकडून तेजीकडे वाढत आहे कारण सुरूवातीच्या कलात चीनमधील पीएमआय निर्देशांकात यंदा घसरण झाल्याने बाजारात अस्थिरता होती. मात्र एकूणच पुन्हा आशियाई बाजारात युएस बाजारातील अपेक्षित व्याजदरातील कपातीचा परिणाम सकारात्मक होताना दिसला. भारतीय बाजारातही तीच परिस्थिती गिफ्ट निफ्टी वाढल्यानंतर स्पष्ट झाली होती. आगामी युएस सोबत कराराची बोलणी अंतिम टप्प्यात गेल्याने तसेच भूराजकीय स्थितीत सुधारणा झाल्याने आज शेअर बाजारात वाढ अपेक्षित आहे.
सकाळच्या सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ वेलस्पून लिविंग (१२.२८%), न्यूलँड लॅब्स (४.१९%), आयपीसीए लॅब्स (४.०९%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (३.६०%), झी एंटरटेनमेंट (३.४३%), पुनावाला फायनान्स (३.३०%), वरूण बेवरेज (३.०५%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण टीआरआरएल (४.३४%), जेल इंडिया (४.१९%), वन सोर्स (३.९०%), एमसीएक्स (३.३७%), ज्योती सीएनसी ऑटो (२.८०%), टीबीओ टेक (२.२९%), जीएमडीसी (२.५०%), वालोर इस्टेट (२.३१%), स्विगी (२.१६%) समभागात झाली आहे.