पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्या आणि पुण्यातील माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्याबाबत मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. पक्षांतर्गत वादामुळे त्या अस्वस्थ असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती, त्यामुळे त्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणं निश्चित मानलं जात आहे. राजकीय वर्तुळात रुपाली पाटील यांच्या पुढील वाटचालीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. रुपाली पाटील यांनी त्यावेळी ही भेट राजकीय नसल्याचं सांगत 'घड्याळ' सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आता राजीनामा दिल्यानंतर त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता बळावली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत रुपाली पाटील यांनी २०२१ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, आता पुन्हा त्या पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
साऊथची लोकप्रिय सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने चाहत्यांना मोठा धक्का देत गुपचूप दुसरं लग्न उरकलं आहे. समंथानं प्रसिद्ध वेब सीरिज ...
'ख्वाडा' करणार! राष्ट्रवादीतील दोन 'रुपालीं'मध्ये उफाळला वाद
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सध्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असून, हा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या दोन नेत्या म्हणजे रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर. या वादाची ठिणगी बीडमधील एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातून पडली. या प्रकरणात पीडितेला न्याय न देता, उलट तिच्या चारित्र्यावर आघात करण्यात आल्याचा दावा रुपाली पाटील यांनी केला होता. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार आणि 'माझा आवाज दाबला जाईल?' असा थेट सवाल रुपाली पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना आणि रुपाली चाकणकर यांना विचारला होता. या संपूर्ण प्रकरणात रुपाली पाटील ठोंबरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, "आमचा इतिहास अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, तर गरज पडल्यास 'ख्वाडा' (प्रतिरोध/दडपशाही) करणाऱ्यांचा आहे." रुपाली पाटील यांनी चाकणकर यांना उद्देशून दिलेला हा इशारा दोन रुपालींमधील पक्षांतर्गत वाद किती टोकाला गेला आहे, हे दर्शवतो. या वादामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून त्या लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
रुपाली पाटील ठोंबरेंना राष्ट्रवादीत 'डबल डच्चू
आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही डच्चू देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत पक्षाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले असले तरी, रुपाली पाटील ठोंबरे यांना पूर्णपणे वगळण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वी प्रवक्त्यांच्या यादीत स्थान न मिळालेले आमदार अमोल मिटकरी यांना स्टार प्रचारकांच्या यादीत संधी देण्यात आली आहे. मात्र, रुपाली पाटील यांना दोन्ही महत्त्वाच्या याद्यांमध्ये स्थान न मिळाल्याने त्यांची पक्षातून गच्छंती (बाहेर पडणे) निश्चित मानली जात होती. या 'डबल डच्चू'मुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, त्या लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.