महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या काही प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील एकूण किती नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींना स्थगिती देण्यात आली आहे, आणि त्यासाठी कधी मतदान होणार आहे, या संदर्भातील सुधारीत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.


आधी राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. आता निवडणूक आयोगाच्या सुधारीत कार्यक्रमानुसार राज्यातील एकूण २४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांवरील निवडणूक पुढे २ डिसेंबर ऐवजी २० डिसेंबर रोजी होणार आहे. ज्या ठिकाणी २ डिसेंबर रोजी मतदान होईल तिथे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि जिथे २० डिसेंबर रोजी मतदान होईल तिथे २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.


निवडणूक आयोगाने सर्व २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया केली. यानंतर छाननी सुरू असताना अनेक आक्षेप आले. या आक्षेपांची दखल घेऊन तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्यास वेळ लागला. यामुळे २४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांवरील निवडणूक २ डिसेंबर ऐवजी २० डिसेंबर रोजी होणार आहे. अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली जाईल. अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपील होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल.


अपील कालावधीनंतरच्या टप्प्यांसाठीच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता दहा डिसेंबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ११ डिसेंबर २०२५ रोजी होईल. यानंतर २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.


अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे: ठाणे- अंबरनाथ. अहिल्यानगर- कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी व नेवासा. पुणे- बारामती व फुरसुंगी- उरुळी देवाची. सोलापूर- अनगर व मंगळवेढा. सातारा- महाबळेश्वर व फलटण. छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री. नांदेड- मुखेड व धर्माबाद. लातूर- निलंगा व रेणापूर. हिंगोली- बसमत. अमरावती- अनंजनगाव सूर्जी. अकोला- बाळापूर. यवतमाळ- यवतमाळ. वाशीम- वाशीम. बुलढाणा- देऊळगावराजा. वर्धा- देवळी. चंद्रपूर- घुग्घूस.


सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांचा तपशील असा: अमरावती: अचलपूर-२, दर्यापूर-१, धारणी-२ व वरूड-१. अहिल्यानगर: जामखेड-२, राहुरी-१, शिर्डी-१, शेवगाव-3३, श्रीगोंदा-१, श्रीरामपूर-१ व संगमनेर-३. कोल्हापूर: गडहिंग्लज-१. गडचिरोली: आरमोरी-१ व गडचिरोली-३. गोंदिया: गोंदिया-३ व तिरोडा-१. चंद्रपूर: गडचांदूर-१, बल्लारपूर-१, मूल-१ व वरोरा-१. छत्रपती संभाजीनगर: गंगापूर-२, पैठण-४ व वैजापूर-२. जळगाव: अंमळनेर-१, पाचोरा-२, भुसावळ-३, यावल-१, वरणगाव-२ व सावदा-३. जालना: भोकरदन-२. ठाणे: बदलापूर-६. धाराशिव: उमरगा-३ व धाराशिव-३. नांदेड: कुंडलवाडी-१, भोकर-१ व लोहा-१. नागपूर: कामठी-३, कोंढाळी-२, नरखेड-३ व रामटेक-१. नाशिक: ओझर-२, चांदवड-१ व सिन्नर-४. परभणी: जिंतूर-१ व पुर्णा-२. पालघर: पालघर-१ व वाडा-१. पुणे: तळेगाव-६, दौंड-१, लोणावळा-२ व सासवड-१. बीड: अंबेजोगाई-४, किल्ले धारूर-१ व परळी-५. बुलढाणा: खामगाव-४, जळगाव जामोद-३ व शेगाव-२. भंडारा: भंडारा-२. यवतमाळ: दिग्रस-३, पांढरकवडा-२ व वणी-१. रत्नागिरी: रत्नागिरी-२. लातूर: उद्‌गीर-३. वर्धा: पुलगाव-२, वर्धा-२ व हिंगणघाट-३. वाशीम: रिसोड-२. सांगली: शिराळा-१. सातारा: कराड-१ व मलकापूर-२. सोलापूर: पंढरपूर-२, बार्शी-१, मैंदर्गी-१, मोहोळ-२ व सांगोला-२ आणि हिंगोली: हिंगोली-२.


काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द


नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी १६ जिल्ह्यांतील नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर (कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा), पुणे (बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची), सोलापूर (अनगर, मंगळवेढा), सातारा (महाबळेश्वर, फलटण), छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री), नांदेड (मुखेड, धर्माबाद), लातूर (निलंगा, रेणापूर), हिंगोली (वसमत), अमरावती (अंजनगावसूर्जी), अकोला (बाळापूर), यवतमाळ (यवतमाळ), वाशिम (वाशिम), बुलढाणा (देऊळगावराजा), वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस यांचा समावेश आहे, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम