डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हॉटेल व्यावसायिकांना खुशखबर! एलपीजी सिलेंडरच्या दरात घट, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: डिसेंबर महिना सुरू होताच एक आनंदाची बातमी आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. कारण हा निर्णय व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या बाबतीत घेतला गेला आहे. कमी केलेल्या नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. तथापि, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या किंवा कमी केल्या नाहीत.


आयओसीएल (इंडियन ऑइल कॉर्पोरेशन) च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत सध्या १ हजार ५४१ एवढी होती. आजपासून हा दर १० रुपयांनी घसरल्यामुळे १ हजार ५३१ रुपयांनी सिलेंडर खरेदी करता येणार आहे. तर दिल्लीमध्ये १ हजार ५८०.५० रुपये मोजावे लागणार आहेत. एलपीजी सिलेंडरबाबत सर्वाधिक महाग असलेल्या शहरात म्हणजे चेन्नईमध्ये आजपासून १ हजार ७३९.५० हा नवीन दर लागू झाला आहे.



घरगुती गॅस सिलेंडरची किंमत


तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. देशभरात १४.२ किलोच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत कायम आहे. बहुतेक शहरांमध्ये ८५० ते ९६० रुपयांच्या दरम्यान सिलेंडर आहे. राजधानी दिल्लीमध्ये, घरगुती एलपीजी सिलिंडर ८५३ ला उपलब्ध आहे, तर मुंबईत त्याची किंमत ८५२.५० आहे. लखनौमध्ये ८९०.५०, वाराणसीमध्ये ९१६.५०, अहमदाबादमध्ये ८६०, हैदराबादमध्ये ९०५ आणि पटनामध्ये ९५१ अशाप्रकारे किंमत आहे.


नोव्हेंबरच्या सुरुवातीला देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ५ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या, तर सप्टेंबरमध्ये ५१ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती १६ रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या.

Comments
Add Comment

जगातील सर्वात मोठ्या १० शहरांची यादी समोर, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली  : संयुक्त राष्ट्रांच्या 'वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स २०२५' या ताज्या अहवालानुसार, जगात

देशात ३० वर्षांत कामगार कमी अन् निवृत्तीधारक वाढणार

भारतावर येणार ‘पेन्शन संकट’! नवी दिल्ली  : भारत सध्या तरुण देश मानला जात असला तरी येत्या ३० वर्षांत वृद्धांची

नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी साधला संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या १२८ व्या

एड्सवरील नवीन औषधाची उपलब्धता कायद्यामुळे संकटात

पेटंट व नियामक परवान्यांमुळे २०२६ पर्यंत पुरवठा करण्यात अपयश मुंबई : एचआयव्हीपासून जवळपास १०० टक्के संरक्षण

गुगल मॅप अॅपमध्ये नवीन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध

मुंबई (प्रतिनिधी) : गुगल मॅप अॅपमध्ये आता नवीन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध झाला असून तो सुरुवातीला फक्त पिक्सेल १०

नॅशनल हेराल्ड खटल्यात सोनिया आिण राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल

गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप, नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड खटल्यात नवीन गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.