मतदानाच्या तोंडावर २० जिल्ह्यांत तारखांमध्ये बदल

नगर परिषदांसाठी २ ऐवजी २० डिसेंबरला मतदान


राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बारामती, मंगळवेढ्यासह अनेक नगर परिषदा न्यायालयीन कचाट्यात


मुंबई :राज्यात नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, प्रचार संपण्यास काही तास बाकी असतानाच मतदानाच्या तोंडावर राज्यातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, सातारा, नांदेड, अमरावती, अकोला, आदी २० जिल्ह्यांतील नगरपालिकांचा यामध्ये समावेश आहे. कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली आहे.


नगर परिषद निवडणुकांमध्ये अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या दाव्यांवरती उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी नगर परिषद निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील साधारण २० जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामध्ये, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.


अंबरनाथ आणि बदलापुरातही स्थगिती


ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिषदेच्या निवडणुकीतही याचा फटका बसला, तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील सहा प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित झाली आहे. ही निवडणूक आता २० दिवस लांबणीवर गेली असून पूर्वी २ डिसेंबरला होणारे मतदान आता २० डिसेंबरला होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगर परिषदेचीही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. येथील दिग्रस पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तेथे निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नव्याने कार्यक्रम दिला असून आता निवडणुक २० डिसेंबरला होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील ४ नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. त्याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे ढकललेल्या नगर परिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये १० डिसेंबरपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर २० डिसेंबर मतदान आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती आहेत. बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता २० डिसेंबर रोजीपर्यंत पुढे ढकलली आहे. नगराध्यक्षपदाचाही यामध्ये समावेश असल्याने बारामतीचे नगर परिषदेचे मतदान थेट २० डिसेंबर रोजी घेतले जाणार आहे.

Comments
Add Comment

Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार मुंबई :

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य